एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमरावतीत फोडाफोडी, पोटे-रवी राणा वाद टोकाला; भाजपचं कार्यालय फोडलं
अमरावती: आमदार रवी राणा यांचं कार्यालय काल भाजप कार्यकर्त्यांनी फोडलं होतं, त्याचा बदला घेत मध्यरात्री आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली आहे. राजापेठ परिसरातल्या भाजपच्या विभागीय कार्यालयावर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत नासधूस केली आणि पोस्टरही फाडले.
रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कालच्या या तोडफोडीमुळे आज भाजपकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागेल. दरम्यान हा राडा होण्याआधी आमदार रवी राणा यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा. या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं.
दरम्यान याआधी रवी राणा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. तोडफोड सुरु असताना पोलिस तिथे हजर असून कोणीही त्यांना जुमानलं नाही. पोलिसांसमोरच कार्यालयाच्या काचा फोडल्या आणि खुर्च्याही फेकल्या होत्या.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप, आमदार रवी राणा यांनी केला होता. अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटेंविरोधात केलेल्या विधानामुळे रवी राणांच्या ऑफिसची तोडफोड झाल्याचं म्हटलं जात आहे.
…तर प्रवीण पोटेंच्या कानाखाली लगावेन : रवी राणा
काय आहे वाद?
अमरावतीच्या भीमटेकडी परिसरात डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण नियोजित होतं. मात्र परवानगी मिळण्याआधीच 13 तारखेच्या मध्यरात्री आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी पुतळ्याचं अनावरण केलं. यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत रवी राणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अडथळा आणणारे प्रवीण पोटे यांच्या कानाखाली लगावेन, अशी धमकी दिली होती.
रवी राणा हे अमरावतीतील अपक्ष आमदार आहेत. तर प्रवीण पोटे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्रीही आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
क्राईम
क्रीडा
Advertisement