एक्स्प्लोर
भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, काकडे यांची घोषणा
भाजपचे पुण्याचे सहयोगी खासदार संजय काकडे हे लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: काकडे यांनी दिली आहे. सध्याची बदलेली परिस्थिती पाहता मी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असं ते म्हणाले. काकडे काँग्रेसच्या तिकीटावर पुणे लोकसभेची जागा लढण्याची शक्यता आहे.
पुणे : भाजपचे पुण्याचे सहयोगी खासदार संजय काकडे हे लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: काकडे यांनी दिली आहे. सध्याची बदलेली परिस्थिती पाहता मी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असं ते म्हणाले. काकडे काँग्रेसच्या तिकीटावर पुणे लोकसभेची जागा लढण्याची शक्यता आहे.
मागील दोन दिवस मी दिल्लीत होतो. तिथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मी भेटलो. मला काँग्रेस पक्षात काम करायचं आहे, असं त्यांना सांगितलं. त्यांनी माझ्या निर्णयाचं स्वागत केलं आणि लवकरात लवकर माझा प्रवेश घेतला जाईल, असं त्यांनी जाहीर केलं, अशी माहिती संजय काकडे यांनी दिली.
काँग्रेस त्यागातून निर्माण झालेला पक्ष आहे, अशी माझी धारणा आहे. काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, जो सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन चालतो. त्यामुळे हा पक्ष आपल्यासाठी योग्य राहील, त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय मी घेतला आहे, असं काकडे म्हणाले. यापुढे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जे काही निर्णय घेतील ते मला मान्य राहील, असं देखील संजय काकडे म्हणाले.
मी कोणत्याही पक्षात गेलो तरी माझी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातली मैत्री कायम राहील, असं संजय काकडे म्हणाले.
मागील अनेक दिवसांपासून संजय काकडे भाजपला रामराम करतील, अशी चर्चा होती. त्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. संजय काकडे हे राज्यसभेचे खासदार आहेत. काकडे याआधी राष्ट्रवादीत होते. अजित पवारांशी संजय काकडे यांचे मतभेद झाल्याने आणि राज्यसभा उमेदवारी न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. त्यानंतर अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement