एक्स्प्लोर

निधी आणला, परिसर हिरवा केला, आता तरी शहाजीबापूंचं लीड वाढवणार की नाही? भाजप खासदाराचा सवाल

Maharashtra Politics: सांगोला तालुक्यातील कोळा येथे बापुंच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीसाठी निंबाळकर आले होते. त्यावेळी बापूंचं मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असं

Maharashtra Political Updates: शहाजीबापूंचे नाव महाराष्ट्राला माहीत नाही, असं कोणी नसेल इतकी प्रसिद्धी आमदार शहाजीबापू पाटलांना (Shahajibapu Patil) मिळाली आहे, मात्र कोट्यवधींची कामं करून आणि दुष्काळी सांगोल्याला (Sangola News) जवळपास 8 टीएमसी पाणी मिळवून दिल्यावर आता तरी त्यांचं लीड वाढणार का? असा प्रश्न सध्या शहाजीबापूंचे जिवलग मित्र खासदार रणजित निंबाळकर (MP Ranjeetsingh Nimbalkar) यांना पडला आहे. सांगोला तालुक्यातील कोळा येथे बापुंच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीसाठी निंबाळकर आले होते. बापूंच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 10 जेसीबीमधून टनभर झेंडूच्या फुलांची उधळण करत त्यांच्या गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली. यानंतर झालेल्या सभेत बोलताना निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना सवाल करत यंदा बापूंचे लीड वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. 

आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेल्या काही महिन्यात शेकडो कोटी रुपयांचा निधी तालुक्यासाठी आणला आहे. राजेवाडीचे नव्यानं 1 टीएमसी पाणी, देवघराची 1 टीएमसी पाणी, टेम्भूचं 5 टीएमसी पाणी आणि म्हैसाळचं पाणी असं मिळून जवळपास 8 टीएमसी पाणी बापूंनी तालुक्याला मिळवून दिल्याचा दावा खासदार निंबाळकर यांनी केला आहे. माझ्या फलटण पेक्षाही जास्त पाणी टेलला असणाऱ्या दुष्काळी सांगोला तालुक्याला जादा मिळणार असल्यानं हे श्रेय आमदार शहाजीबापू यांचंच असल्याचं त्यांनी सांगितलं. 

पुढची माढा लोकसभा अथवा सांगोला विधानसभेची निवडणूक पाण्यावर होणार नाही, हा शब्द आम्ही पूर्ण केल्याचं निंबाळकर यांनी सांगितलं. शहाजीबापूंसोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे, उद्योजक भाऊसाहेब रुपनर, भाजप जिल्हाध्यक्ष चेतन केदार असं नेते असताना किमान यंदा तरी बापूंचे लीड वाढवायचं काम करावं लागेल, असं आवाहन निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. 

सांगोला शेकापचा बालेकिल्ला, आगामी विधानसभेत शहाजीबापूंचं भवितव्य काय? 

सांगोला तालुका हा पहिल्यापासून शेकापचा बालेकिल्ला असला तरी गेल्यावेळी ज्येष्ठ आमदार कै. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासोबत झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील हे केवळ 768 मतांच्या निसटत्या फरकानं विजयी झाले होते. आता डॉ. अनिकेत देशमुख आणि डॉ. बाबासाहेब देशमुख या दोन चुलत भावंडानी सांगोला तालुक्यातील शेकापची ताकद पुन्हा एकवटण्याचं काम सुरू केल्यानं बापूंच्या समोरची चिंता नक्कीच वाढणार आहे. यातच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे हे अजित पवार गटात आल्यानं बापूंची ताकद वाढणार असली तरी दीपक साळुंखे यांनाही 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढण्याचे वेध लागले असल्यानं खासदार निंबाळकर यांनी त्यांच्या समोरच शहाजीबापूंचं लीड वाढविण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना करत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. अजून जरी विधानसभेला वेळ असला तरी शहाजीबापूंच्या समोर उमेदवार कोण-कोण असणार यावर बापूंचं भवितव्य अवलंबून आहे.  यामुळेच यंदा बापूंचं लीड वाढवण्याचं आवाहन करयाची वेळ खासदार रणजित निंबाळकर यांच्यावर आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal Full PC : ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत - छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
Embed widget