एक्स्प्लोर
बलात्कारप्रकरणी भाजप नेता रवींद्र बावनथडेला अटक
गडचिरोली: गडचिरोलीमधील भाजपचा जिल्हा सरचिटणीस रवींद्र बावनथडे याला अखेर अटक करण्यात आली आहे. एका युवतीच्या तक्रारीनंतर नागभीड पोलिस ठाण्यात बावनथडेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी बावनथडेला अटक केली.
एका खासगी बसमध्ये प्रवास करताना युवतीशी अश्लिल चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन दिवसांपूर्वी व्हॉट्स अॅपवर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
रवींद्र बावनथडे याने नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केले असा दावा पीडित मुलीनं केला आहे.
काय आहे प्रकरण?
बावनथडे आणि एक तरुणी 27 जूनला नागपूरवरुन नागभिडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होते. या बसमध्येच त्याने तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येतं.
ट्रॅव्हल्समधील सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हॉट्सअपवर व्हायरल झाला आहे.
धक्कादायक म्हणजे या बसमध्ये अनेक प्रवासी असूनही, बावनथडे शारीरिक संबंध करत असल्याचं या व्हिडीओत स्पष्ट दिसतं.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरुणीने पोलिस स्टेशन गाठून तिने बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. बावनथडेने नोकरीचं आणि लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कोण आहे रवींद्र बावनथडे?
वयाची पन्नाशी गाठलेला रवींद्र बावनथडे हा भारतीय जनता पक्षाचा जुना कार्यकर्ता असून, सध्या भाजपचा गडचिरोली जिल्हा सरचिटणीस आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणूनही तो कार्यरत आहे. बावनथडे हा आरमोरी तालुक्यातील वासाळा येथील कर्मवीर विद्यालयात शिक्षक होता.
संबंधित बातम्या:
चालत्या बसमधील सेक्स व्हिडीओ, भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement