एक्स्प्लोर

Shikhar Bank Scam: 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांसह रोहित पवारांना दिलासा; नेमकं काय होतं प्रकरण?

Shikhar Bank Scam : गेल्या अनेक वर्षांपासून गाजत असलेल्या 25 हजार कोटींच्या कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे.

Shikhar Bank Scam : गेल्या अनेक वर्षांपासून गाजत असलेल्या 25 हजार कोटींच्या कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणात मोठी कायदेशीर घडामोड समोर आली आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह एकूण 70 जणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Shikhar Bank Scam: ईडीच्या केसमध्येही दिलासा मिळणार 

मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याच्या आधारेच Enforcement Directorate (ED) ने मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. मात्र, आता मूळ गुन्ह्यात पुरावे आढळले नसल्याने पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि तो न्यायालयाने स्वीकारला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जर मूळ (प्रेडिकेट) गुन्हाच रद्द झाला, तर त्यावर आधारित मनी लाँड्रिंगचा गुन्हाही टिकू शकत नाही. त्यामुळे ईडीच्या प्रकरणातही सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shikhar Bank Scam: काय होते प्रकरण?

2007 ते 2011 या कालावधीत शिखर बँकेकडून साखर कारखाने आणि सूतगिरण्यांना नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा आरोप होता. तोट्यात गेलेल्या कारखान्यांना पुन्हा कर्ज देणे, नंतर कर्ज न फेडल्यामुळे कवडीमोल भावात लिलाव आणि ते कारखाने संबंधितांच्या जवळच्या व्यक्तींनी खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या व्यवहारांमुळे बँकेला अंदाजे 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता.

Shikhar Bank Scam: न्यायालयाचा निर्णय

या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी क्लोजर रिपोर्टविरोधात निषेध याचिका (प्रोटेस्ट पिटिशन) दाखल केली होती. तसेच ईडीनेही हस्तक्षेप अर्ज केला होता. मात्र, विशेष न्यायालयाने हे दोन्ही अर्ज फेटाळून लावत क्लोजर रिपोर्टवर शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे या प्रकरणातील सर्व 70 आरोपींवरील आरोप संपुष्टात आले आहेत.

Shikhar Bank Scam: राजकीय परिणाम

शिखर बँक प्रकरण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत चर्चेचे प्रकरण होते. या निकालामुळे पवार कुटुंबीयांवरील ईडीची कारवाईही रद्द होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, अनेक वर्षांचा कायदेशीर वाद आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

आणखी वाचा 

Sunil Tatkare: दादांना जाऊन एक महिना झाला; अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाले तिथं जाऊन सर्वांनी घेतलं दर्शन, तटकरे म्हणाले, 'दादांचे शव इथे असताना विलीनीकरण...'

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
Maharashtra Breaking LIVE Updates: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया; डॉक्टरांचा महिनाभर विश्रांतीचा सल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया; डॉक्टरांचा महिनाभर विश्रांतीचा सल्ला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Embed widget