(Source: ECI/ABP News/ABP Majha)
kirit somaiya : मंत्र्यांचे नंबर लागलेत, आता ठाकरे परिवाराचा नंबर ; किरीट सोमय्यांचा इशारा
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी आज विरारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
kirit somaiya : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय. "ठाकरे सरकारमधील मंत्री असो की, ठाकरे परिवारातील कोणी असो, घोटाळा करणाऱ्यांना सोडणार नाही. मंत्र्यांचे नंबर लागले आहेत, आता ठाकरे परिवाराचा नंबर आहे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.
किरीट सोमय्या यांनी आज विरारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. "आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील कुणी पोलीस ठाणे, कुणी वकिलांच्या, कुणी उच्च न्यायालाय, कुणी ईडी तर कुणी सीआयडी कार्यालयात जात आहेत. शिवाय कुणी हॉस्पीटलमध्ये जात आहेत, असा टोला लगावत जो कुणी घोटाळा करणार त्याला सोडणार नाही, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावरूनही किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. कुणावर हिरवा रंग जोरदार लागला? त्यामुळे त्यांना राम आठवलाय. राज्य सरकारची शेवटची गिणती सुरु झालीय. त्यामुळे यांना शेवटच्या क्षणी राम आठवतोय. नुकतेच हिरवे झालेत ते आयोध्यात जात आहेत, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.
"मी मनसुख हिरेन याच्या घरी गेलो त्यावेळी त्याच्या कुटुंबातील लोकांनी समाधान व्यक्त केलं. आयुष्यभर हत्याराची पत्नी असा आरोप आमच्यावर झाला असता, असे त्याच्या पत्नीने सांगितले. मनसुखला मारण्याची सुपारी सचिन वाझे आणि प्रदिप शर्मा यांनी दिली. ते दोघे ही उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकारी होते. त्यामुळे आपण एनआयला भेटणार असून वाझे आणि शर्माला कुणी सुपारी दिली होती? याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे" सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्याबाबत काय झाले? या प्रश्नावर किरीट सोमय्या यांनी, हा प्रश्न शंभर वेळा झालाय आता विचारु नका असं सांगत उत्तर देणं टाळलं.
किरीट सोमय्या उद्या आपल्या पत्नी आणि मुलांसह मुलुंड पोलीस ठाण्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अब्रू नुकसानीची तक्रार दाखल करणार आहेत. त्यानंतर सात दिवसात काही कारवाई झाली नाही तर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सोमय्या यांनी यावेली सांगितले.
महत्वाच्या बातम्या