एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
''होय, आम्ही उमेदवारांकडून पैसे घेतले, पण''... , भाजपचं स्पष्टीकरण
नाशिक : उमेदवारासाठी नव्हे तर पक्षनिधीसाठी उमेदवारांकडून पैसे घेतल्याचा खुलासा भाजपने निवडणूक आयोगाकडे केला आहे. नाशिकमध्ये भाजप उमेदवारीसाठी पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आयोगाने याप्रकरणी नोटीस बजावली होती.
हो, आम्ही उमेदवारांकडून पैसे घेतले, पण तिकिटासाठी नाही तर पक्ष निधीसाठी, असं भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी निवडणूक आयोग आचारसंहिता कक्षाला दिलेल्या उत्तरात म्हटलंय.
दरम्यान, याप्रकरणी भाजपला अजून सखोल माहिती द्यावी लागणार आहे. किती उमेदवारांकडून किती पैसे आणि कसे घेतले याचा हिशेब भाजपाला द्यावा लागणार आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिकमधल्या भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात तिकीट वाटपादरम्यान उमेदवारांकडून दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. भाजपचे पदाधिकारी नाना शिलेदार आणि अरूण शेंदुर्णीकर एका उमेदवारांकडून दोन लाखांची मागणी करताना व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत होते.
प्रचार खर्चासाठी दोन लाखांची मागणी करण्यात आल्याचं स्पष्टीकरण भाजप नेत्यांकडून देण्यात आलं. नाशिकमध्ये भाजप मध्यवर्ती कार्यालयातली ही व्हिडीओ क्लीप आहे. एबीपी माझा व्हिडीओची सत्यता पडताळत असून व्हिडीओ बनवणारी व्यक्ती अद्याप पुढे आली नाही.
दुसऱ्या व्हिडिओत भाजप नेते गोपाळ पाटील यांनी तिकीट कापल्यानंतर 10 लाख देऊनही तिकीट न दिल्याची नाराजी व्यक्त केली आहे.मात्र हे विधान ज्याला तिकीट मिळालं, त्या प्रतिस्पर्धी इच्छुकाचं असून, मनसेनं हे कुभांड रचल्याचा आरोप केला जात आहे. जे वाक्य माझ्या मुखात नाही, ते घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा इच्छुकाने केला आहे.
संबंधित बातम्या :
उमेदवारीसाठी दोन लाख, नाशिक भाजप शहराध्यक्षांना नोटीस
10 लाख देऊनही तिकीट नाही, भाजप इच्छुकाचा दुसरा व्हिडिओ?
VIDEO : नाशिकमध्ये भाजपकडून एबी फॉर्मसाठी 2 लाख रुपयांची मागणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement