एक्स्प्लोर
तुफान डायलॉगबाजी, सभागृहात हास्यकल्लोळ, जयंत पाटलांचं भाषण जसंच्या तसं
मुंबई : कटप्पानं बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर सगळ्यांनाच मिळालं आहे. मात्र, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी विरोधक एकनाथ खडसेंच्या घरी का गेले होते, याबाबत जयंत पाटलांनी केलेल्या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
जयंत पाटील यांचं भाषण जसंच्या तसं :
“आम्ही नाथाभाऊंच्या घरी गेलो होतो. स्वागत केलं होतं नाथाभाऊंनी. थांबले होते बिचारे आमच्यासाठी. त्यांचं आमच्यावर एवढं प्रेम आहे. मी, दादा, राधाकृष्ण विखे-पाटील असे आम्ही तिघे-चौघे गेलो होतो. शेतात सुखाने, शांतपणे, आनंदी जीवन जगतायेत ते. सत्तेच्या नादाला लागल्यावर माणसाचं सगळं बिघडतं. एकदा सत्तेतून बाहेर आलो की, माणूस अतिशय सुखी होतो, समाधानी होतो. अरे पंधरा वर्षे जे तुमच्या वाटेला आलं, ते दोन-तीन वर्षे आमच्या वाटेला आलं, तर एवढं का वाईट वाटून घेताय? सत्ता कधीही जाऊ नये, असं वाटणं ज्यावेळी सुरु होतं, त्यावेळेस सत्ता जाते. त्यामुळे धीस इज बिगिनिंग... पण नाथाभाऊ फार समाधानी वाटले. अजितदादांनी त्यांना बँकेबद्दल प्रश्न विचारले, जिल्ह्याबद्दल प्रश्न विचारले. राधाकृष्ण पाटलांनी प्रश्न विचारले. अतिशय दिलखुलास चर्चा आमची झाली. पण नाथाभाऊ त्या रस्त्यात आमचं स्वागत करायला का थांबलेले, हा सगळ्या महत्त्वाचा प्रश्न आहे. आमची गाडी येणार होती. आम्ही सहज म्हटलं, नाथाभाऊ आहेत का बघू चला... नाथाभाऊ म्हटले, तुम्ही या. कटप्पाने बाहुबली को क्यों मारा? ये जानने के लिए हम आपके घर आए थे... महाराष्ट्राला या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. महाराष्ट्राला हे उत्तर ज्या दिवशी मिळेल ना... ज्या दिवशी या राज्यातला बाहुबली बोलायला लागेल, त्यावेळी भूकंप होईल, असं त्यांनीच मला सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं, मी ज्या दिवशी बोलेन ना, त्या दिवशी या देशात भूकंप होईल. आता ‘ये भूकंप कब होगा?’... आम्ही त्या मार्गाने जात असताना नाथाभाऊंनी आमचं स्वागत केलं. चंद्रपूरला गेलो होतो आम्ही. केलं का तिथल्या मंत्र्यांनी आपलं स्वगत... सांगितलं असतं तर चंद्रपूरच्या मंत्र्यांच्या घराच्या जवळून गेलो असतो.”बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement