एक्स्प्लोर

ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही, 28 वर्षांपासून निधी लाटला

बारामती शहरालगत असलेला त्रिशंकू भागात ही बोगस ग्रामपंचायत दाखवण्यात आली.

मुंबई : अस्तित्वातच नसलेल्या ग्रामपंचायतीसाठी गेल्या 28 वर्षांपासून निधी लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामती ग्रामीण ग्रामपंचायत दाखवून 1985 ते 2012 या काळात निधी लाटण्यात आला. याप्रकरणी 2010 पासून चौकशीचा फार्स सुरू आहे.. पण अजून काहीच कारवाई झालेली नाही. ग्रामपंचायत बारामती ग्रामीणचं बनावट लेटर हेड.. बनावट शिक्के.. ही ग्रामपंचायत कागदावर दिसत असली तरी ती प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. बारामती शहरालगत असलेला त्रिशंकू भागात ही बोगस ग्रामपंचायत दाखवण्यात आली. यासाठी 1985 पासून पाच ग्रामसेवक होते. एक ग्रामसेवक तर तबबल 17 वर्षे काम करत होता. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांना अशी ग्रामपंचायत नसल्याची माहिती 2010 मध्ये मिळाली. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात अनेक मंत्र्यांचे उंबरठे झिजवले. पण याबाबत अजूनही कारवाई झालेली नाही. चौकशी अहवाल काय सांगतो? या प्रकरणात विधी मंडळ पंचायत राज समितीची चौकशीही लावण्यात आली होती. या समितीच्या पाच आमदारांनी बारामतीमध्ये जाऊन या प्रकरणाची चौकशी केली, अहवाल दिला.. नागपूरला 2015 सालच्या हिवाळी अधिवेशनात अहवाल मांडला. या प्रकरणात 28 अधिकारी दोषी असल्याचा अहवाल देखील पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे. पण असं असून अजूनही कारवाई केली जात नाही. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 2011 साली पत्रही दिलं. पण त्यावर अजित पवार यांच्याकडूनही काही उत्तर दिलं गेलं नाही. बारामतीमध्ये अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीवर भाजप सरकार आल्यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही चौकशी लावली, पण कारवाई शून्य.. 1985 सालापासून एक ग्रामपंचायत अस्तित्वात नसताना फक्त सर्जरी योजनेचे पैसे लाटण्यासाठी अधिकाऱ्यांनी घोटाळा केला. पण सरकार दरबारी मात्र या अधिकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरटीआय कार्यकर्त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी आता कारवाई केली नाही तर हायकोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अस्तित्वातच नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावावर कुणी पैसे उकळले? पैसे उकळणाऱ्यांना कोण आणि का पाठिशी घालतंय? अशा प्रश्नांची उत्तरं समोर येण्याची गरज आहे. याची जबाबदारी ग्रामविकासमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Maharashtra Goverment Cabinet Decision: सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय
सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय
दुष्काळाने शेती करपली, रोजगारही हिरावला; कर्जाच्या ओझ्याने हतबल झाला अन् 29 वर्षीय तरुणाने जीव संपवला, चिठ्ठीत कर्जवसुलीच्या तगाद्याचा उल्लेख
दुष्काळाने शेती करपली, रोजगारही हिरावला; कर्जाच्या ओझ्याने हतबल झाला अन् 29 वर्षीय तरुणाने जीव संपवला, चिठ्ठीत कर्जवसुलीच्या तगाद्याचा उल्लेख

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pradeep Purnekar Thane Crime: पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Embed widget