Bachchu Kadu : बच्चू कडूंची 'बच्चूं'सोबत धमाल, लहान मुलांसोबत घालवला दिवस
Bachchu Kadu: राज्यमंत्री बच्चू कडू काल (3 डिसेंबर) आपल्या मतदार संघात फिरत होते.
Bachchu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) काल (3 डिसेंबर) आपल्या मतदार संघात फिरत होते. यावेळी फिरत असताना त्यांच्या गाडीमध्ये कार्यकर्त्याऐवजी लहान पाहायला मिळाली. त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडला की, एरवी त्यांच्या वाहनात चार-पाच कार्यकर्ते नेहमी असतात पण ही लहान मुलं का त्यांच्या गाडीमध्ये बसली आहेत?
काल बच्चू कडू हे ग्रामीण भागात गेले असता काही मुलं त्यांच्याकडे पाहत होते. यावेळी त्या मुलांशी त्यांनी संवाद साधला आणि तेव्हा या चिमुकल्यांनी बच्चू कडू यांच्या वाहनात बसण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्या मुलांनी बच्चू कडू यांच्याकडे 'तुम्ही आमच्या घरी चला आणि आमच्या समस्या, सोडवा; असा हट्ट धरला. बच्चू कडू यांनी त्या मुलांना त्यांच्या गाडीमध्ये बसण्याची परवानगी दिली. मग त्या मुलांच्या घरी बच्चू कडू गेले. यावेळी एका मुलाच्या घरी बच्चू कडू गेले तेव्हा त्या मुलाच्या आजोबांनी त्यांच्याकडे घरकुलची मागणी केली तेव्हा बच्चू कडू यांनी ती तातडीने पूर्ण केली. लहान मुलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद पाहायला मिळाला. त्यानंतर बच्चू कडू यांनी त्या चिमुकल्यांसोबत गप्पा मारल्या तेव्हा एका मुलाने बच्चू कडूला सांगितले की, 'आम्ही नशीबवान आहोत.' बच्चू कडू यांनी विचारले ते 'कसं' तर त्या मुलाने सांगितले की, 'बच्चू कडू यांच्यासोबत फिरलो याला नशीब लागते.' तेव्हा काही काळ बच्चू कडू हे निशब्द झाले.
बच्चू कडू म्हणाले की, ' बच्चे कंपनीला घेऊन मी काल दिवसभर फिरलो खूप मज्जा आली. पण एकमात्र नक्की की, या मुलांसोबत गप्पा मारतांना खूप मज्जा तर आलीच पण त्यांनी जे जे मागितलं ते मी पूर्ण करू शकलो याचा आनंद मला खूप झाला. आणि मला खूप लोकं भेटतात, आपली कामं सांगतात पण या मुलांनी जे मागितलं ते त्यांच्या साठी खूप मोठं काम होतं मला हे काम करण्याचं भाग्य मिळालं'
संबंधित बातम्या
नाशिकमध्ये असूनही देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनात जाणार नाहीत, ट्वीट करत सांगितलं कारण
अवकाळीचा दणका! कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; भाज्यांचे भाव स्थिर