एक्स्प्लोर
करणी, जादूटोणाच्या संशयातून मावशीच्या पतीची कुऱ्हाडीनं हत्या
नागपूर: नागपूरमधील दावसा गावात एक वृद्ध अंधश्रद्धेचा बळी ठरला आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन पुतण्या सुधाकर नेहारे यानं आपल्या मावशीचा पती रामाजी गामाजी राऊत यांच्यावर कुऱ्हाडीनं वार करत हत्या केली.
हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला. त्यानंतर त्यानं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. मयत रामाजी गामाजी राऊत हे जादुटोणा आणि करणी करत असल्याचा संशय असल्यामुळे ही हत्या केल्याची कबुली आरोपी सुधाकर नेहारे यानं दिली.
दरम्यान, कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement