एक्स्प्लोर
मोदी सरकारवर अशोक चव्हाणांची शायरीतून टीका
सांगलीत आज जनआकोश आंदोलनाचा समारोप झाला. यावेळी मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण बोलत होते.

प्रातिनिधिक फोटो
सांगली : काळा पैसा आणण्याआधी देशाचा बाहेर गेलेला पांढरा पैसा भारतात आणा, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी अशोक चव्हाणांनी शायरीच्या माध्यमातून टीका केला. सांगलीत आज जनआक्रोश आंदोलनाचा समारोप झाला. यावेळी मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण बोलत होते. अशोक चव्हाण काय म्हणाले?
'थाम के निम को, चंदन को वो ले गये, अपने सारे कारोबार लंडन को ओ ले गये । छाती ठोक कर जो कहते है, काला धन ले आयेगे, उनके नाक के नीचे से ओ सफेद धन भी वो ले गये।शरद पवार – उद्धव ठाकरे भेटीवरही भाष्य शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली, ही चांगली गोष्ट आहे. यावर आमची भूमिका काय घ्यायची ते ठरवू, असे अशोक चव्हाण म्हणाले. शिवाय, शिवसेनेकडे थोडा तरी स्वाभिमान शिल्लक असेल, तर त्यांनी सतेतून बाहेर पडून हे सरकार पाडलं पाहिजे, असे म्हणत अशोक चव्हाणांनी शिवसेनेला आव्हान दिले. बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरुन केंद्रावर टीकास्त्र आधी मुंबईतील लोकल ट्रेन व्यवस्था सुधारा, लोक किड्या मुंग्याप्रमाणे मरतात. पण यांना बुलेट ट्रेन आणायची आहे. हजारो कोटी रुपये खर्चून याचा फायदा कुणाला होणार आहे?, असे म्हणत चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
आणखी वाचा























