एक्स्प्लोर
आम्ही भारतीय आहोत आणि राहू : असदुद्दीन ओवेसी
नांदेड : भारतीय मुस्लिमांना अनेकदा पाकिस्तानमध्ये काय चाललंय, ते सांगण्यात येतं. पण पाकिस्तान हे ना मुस्लिम राष्ट्र आहे, ना इस्लामिक राष्ट्र. आम्ही भारतीय आहोत आणि राहू असा इशारा एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिला. नांदेडमधील एमआयएमच्या सभेत ओवेसी बोलत होते.
"शरियत कायदा अनादी काळापासून, अनेक लोक येतील आणि जातील"
देशात शरियत कायद्याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्यावर मंथन करण्यासाठी एमआयएमकडून सभा घेण्यात आली होती. देगलूर नाका भागात झालेल्या या सभेत ओवेसी यांनी अनेक मुद्द्यांवरून पंतप्रधान आणि भाजपवर हल्ले चढवले. शरियत कायदा हा अनादी काळापासून आहे आणि राहील. यादरम्यान अनेक लोक येतील आणि जातील, असा टोलाही ओवेसींनी पंतप्रधानांचं नाव न घेता लगावला.
"पंतप्रधानांची मुस्लिमांबद्दलची सहानुभूती बेगडी"
पंतप्रधान सध्या मुस्लिमांबद्दल सहानुभूती असल्याचं सांगत आहेत. पण त्यांची ही सहानुभूती बेगडी असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला. जेएनयूमध्ये 23 दिवसांपासून उत्तर प्रदेशातील एक मुस्लिम युवक बेपत्ता आहे. त्याची तक्रार देखील घेतली जात नाही. कारण त्याला संघ परिवाराने मारहाण केली आहे. त्यामुळेच मुस्लिमांबाबत सहानुभूती बेगडी असल्याचं ओवेसी यांनी म्हटलं आहे.
"मध्य प्रदेशातील सिमीच्या लोकांचे एन्काऊंटर बनावट"
"मध्य प्रदेशात जेल तोडून जाणाऱ्या सिमीच्या लोकांचे एन्काऊंटर करण्यात आले. पण हे एन्काऊंटर बनावट आहे. भाजप सरकारने त्यांची हत्या केली असून, एन्काऊंटरचा केवळ दिखाऊपणा आहे.", असा आरोप ओवेसी यांनी यावेळी केला.
भारत दारुडा देश : ओवेसी
भारत हा जगात तिसऱ्या क्रमांकाचा दारुडा देश आहे. कायद्यातही दारूबंदी सूचवली आहे. पण हे सरकार दारूबंदी तर करत नाही. पण अल्पसंख्याकांच्या धार्मिक परंपरेवर मात्र गदा आणत आहे, असाही आरोप ओवेसी यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement