एक्स्प्लोर

Anil Deshmukh: देवेंद्र फडणवीस 15 दिवस का शांत होते? वाझे-परमबीर सिंहाची पोपटपंची त्यांच्याच आदेशावरुन: अनिल देशमुख

Anil Deshmukh: गेल्या काही दिवसांपासून देशमुख आणि फडणवीस यांच्यात वाक् युद्ध सुरू आहे. अशातच काल केलेल्या आरोपावरती आणि फडणवीसांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर अनिल देखमुख यांनी हल्लाबोल केला आहे.

Anil Deshmukh: गेल्या काही दिवसांपासून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत अनेक खळबळजनक दावे केले केले आहेत, यावरून राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राजकीय फायद्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी मविआतील नेत्यांकडून माझ्यावर दबाव आणला जात होता, असा मोठा दावा परमबीर सिंग यांनी केला होता. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून आता देशमुख आणि फडणवीस यांच्यात वाक् युद्ध सुरू आहे. अशातच काल केलेल्या आरोपावरती आणि फडणवीसांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर अनिल देखमुख यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी यासंबधी पोस्ट आपल्या सोशल मिडीयावरती लिहली आहे. 

काय म्हटलं आहे अनिल देशमुख यांनी आपल्या पोस्टमध्ये? 

"वा... देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जी! मी 15 दिवसापुर्वी, तुम्ही 3 वर्षापुर्वी कसे श्री.उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना तुरुगांत टाकण्यासाठी कटकारस्थान रचले होते, ते मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणले. आता तुम्ही माझ्यावर आरोप करण्यासाठी सचिन वाझे जो देशद्रोहाच्या व 2 खुनाच्या गुन्ह्यांमध्ये 3 वर्षापासुन जेलमध्ये आहे, तसेच परमविर सिंग ज्याने 3 वर्षापुर्वी उद्योगपती श्री.मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कार्पीओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवले आणि नंतर स्कार्पीओ गाडीच्या मालकाची हत्या करणे या दोन्ही गुन्हाचा सुत्रधार आहे. अश्या आरोपी परमविर सिंग याला पुढे केले आहे."

"आता दोघेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरुन पोपटा सारखे बोलत आहे. वरील दोन्ही प्रकरणाचा मुळे सुत्रधार परमविर असल्यामुळे आम्ही त्याला 3 वर्षापुर्वी निलंबीत केले.  त्याला 3 वर्षापुर्वी केंद्रीय एजंन्सी कडुन अटक होणार होती. पण तो भाजपाला शरण गेला आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतल्याप्रमाणे आरोप करीत आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही 15 दिवस का शांत होता आता माझ्यावर आरोप करावयाचे तुम्हाला आठवले काय?, असा सवाल देखील अनिल देशमुख यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. 

काय म्हणाले होते फडणवीस?

माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती. मात्र, आम्ही  त्याचा वेळीच पर्दाफार्श करु शकलो. मी, प्रविण दरेकर, गिरीश महाजन आणि अन्य काही नेते  यांना जेलमध्ये टाकण्याची यात सुपारी दिली होती. पण काही चांगल्या अधिकार्‍यांनी खोट्या केसेस टाकण्यास नकार दिला. माझ्यावर खोट्या केस दाखल करण्यासंदर्भात परमबीर सिंह यांनी एक इन्सिडन्स सांगितला. पण माझ्या अटकेसाठी चार वेळा प्रयत्न झाले, पण त्यांना काही मिळालं नाही. यांचे व्हीडीओ पुरावे  सीबीआयला दिले आहे. आजंही आमच्याकडे अनेक व्हीडीओ पुरावे असल्याचा खळबळजनक दावाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी  केला आहे. ते नागपूर येथे बोलत होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahavikas Aghadi Meeting : विदर्भातील काही जागांवर महाविकास आघाडीची चर्चा रखडलीSamruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?India vs Bangladesh, 2nd Test : 52 धावांची आघाडी, रोहित शर्माकडून डावाची घोषणाABP Majha Headlines : 5 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
Baramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Embed widget