India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
India vs Bangladesh, 2nd Test : भारताने कानपूर कसोटी अनिर्णितकडून विजयाकडे वळवली आहे. दुसऱ्या कसोटीत सोमवारी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 26 धावा केल्या होत्या.
कानपूर : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत (India vs Bangladesh, 2nd Test) भारताने आपला पहिला डाव 9 बाद 285 धावांवर घोषित केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव भारताने 233 धावांत गुंडाळला होता. भारताला पहिल्या डावात 52 धावांची आघाडी मिळाली. पावसाने व्यत्यय आणलेल्या कानपूर कसोटीचा आज चौथा दिवस होता. भारताने कानपूर कसोटी अनिर्णित राहण्याची चिन्हे असताना विजयाकडे वळवली आहे.
Fastest 50 in Tests - 3 overs.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
Fastest 100 in Tests - 10.1 overs.
Fastest 150 in Tests - 18.2 overs.
Fastest 200 in Tests - 24.2 overs
Fastest 250 in Tests - 30.1 overs.
ALL ACHIEVED BY INDIA IN A SINGLE DAY, HATS OFF BOYS...!!! 🙇♂️🇮🇳 pic.twitter.com/oCg2TGMFCc
दरम्यान, भारताने आज बांगलादेशचा डाव गुंडाळल्यानंतर आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जैस्वालने (Yashashwi Jaiswal) पहिल्या 3 षटकातच 51 धावा केल्या. रोहित आणि यशस्वीने चौकार षटकारांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे केवळ 12 षटकांत भारतीय संघाने 1 बाद 121 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 51 चेंडूत धडाकेबाज 72 धावा ठोकल्या. तर कर्णधार रोहित शर्मा 11 चेंडूत 23 धावा करुन माघारी परतला.
Jaiswal - 72 (51).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
KL Rahul - 68 (43).
Kohli - 47 (35).
Gill - 39 (36).
Rohit - 23 (11).
INDIA DECLARE 285/9 IN JUST 34.4 OVERS...!!! 🤯🇮🇳 pic.twitter.com/6O4YzKDpoy
बांगलादेश पहिल्या डावात 233 धावा करून सर्वबाद
भारताने कानपूर कसोटी अनिर्णित राहून विजयाकडे वळवली आहे. दुसऱ्या कसोटीत सोमवारी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 26 धावा केल्या होत्या. बांगलादेश भारतापेक्षा 26 धावांनी मागे आहे. शादमान इस्लाम आणि मोमिनुल हक नाबाद आहेत. भारताकडून रविचंद्रन अश्विनने दोन्ही विकेट घेतल्या. झाकीर हसननंतर हसन महमूदला त्याने बाद केले. बांगलादेश पहिल्या डावात 233 धावा करून सर्वबाद झाला होता. ग्रीन पार्क स्टेडियमवर पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या धुरंदरांनी धमाकेदार खेळ केला.
- Lost 55 overs on Day 1.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
- Day 2 & 3 completely lost.
- Day 5.
- 98 overs.
- Bangladesh trail by 26 runs.
- India set to bat.
INDIA ENFORCING A RESULT IN A TEST MATCH WHICH WAS HEADING FOR A DRAW...!!! 👏🇮🇳 pic.twitter.com/PEQE2FAl6k
तत्पूर्वी भारताच्या पहिल्या डावात रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर यशस्वीच्या साथीला शुभमन गिल आला. गिलनेही 36 चेंडूत 39 धावांची खेळी केली. रिषभ पंत 9 धावा करुन माघारी परतला. यानंतर विराट कोहली आणि के एल राहुलने मोर्चा सांभाळला. या दोघांनीही आक्रमक खेळी केली. विराटने 35 चेंडूत 47 धावा तर के एल राहुलने 43 चेंडूत 68 धावा ठोकल्या.
भारताकडून यशस्वी जैस्वाल (72) आणि केएल राहुल (68) यांनी अर्धशतके झळकावली. विराट कोहली 47 धावा करून शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 27 हजार धावाही पूर्ण केल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने 4 आणि मेहदी हसन मिराजने 3 विकेट घेतल्या. हसन महमूदला 1 बळी मिळाला. भारताकडून तीन अर्धशतकांच्या भागीदारी झाल्या. रोहित आणि यशस्वी यांनी पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. यशस्वी आणि शुभमन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी झाली. कोहली आणि राहुल यांनी पाचव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली.
इतर महत्वाच्या बातम्या