(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahavikas Aghadi Meeting : विदर्भातील काही जागांवर महाविकास आघाडीची चर्चा रखडली
महाविकास आघाडीच्या बैठकीत आज पुन्हा एकदा विदर्भाच्या जागांवर चर्चा
महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा विदर्भातील काही जागांवर अडली
मागील चार तासापासून महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्ष विदर्भातील अधिकाधिक जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील
विदर्भात एकीकडे काँग्रेसची ताकद असताना, शिवसेना ठाकरे गट सुद्धा विदर्भातील काही जागांवर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती
कसा असणार मविआचा जागावाटपाचा फॉर्म्यूला?
महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अजून २० ते २२ जागांवर अजून असल्याचं शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. तर या जागांसाठी मविआची रणनिती कशी असणार हेही त्यांनी सांगितलं आहे. सीटींग आमदार ज्यांचा ती जागा तो पक्ष लढवणार हा महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला असल्याचं त्या म्हणाल्या. या न्यायानं लातूरमधील औसा मतदारसंघाची जागा शिवसेनेची असल्याचंही त्या म्हणाल्या.
लातूरच्या दोन जागांसाठी मागणी
लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघासाठी आमची मागणी असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं असून लातूर जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर विधानसभांच्या जागांसाठीही आम्ही मागणी करतोय असं त्या म्हणाल्या.