एक्स्प्लोर

रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी

मी स्वतः रोहित शर्मा चा फॅन आहे, त्यांच्या अकॅडमीच्या मदतीने ग्रामीण भागतील खेळाडूंना व्यासपीठ मिळत आहे, रोहित शर्मा यांनी मोठं मन दाखवून त्यांची अकॅडमी सुरू करत आहेत.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार (rohit pawar) हे आपल्या मतदारसंघातील कामांसाठी जागृत असतात. मतदारसंघात जास्तीत जास्त विकासकामे करण्यात यावीत, उद्योग उभारावेत यासाठी ते प्रयत्नशील असतात. विशेष म्हणजे मतदारसंघातील एमआयडीसीसाठी त्यांनी थेट विधानभवनात उपोषण केलं होतं. आता, मतदारसंघातील क्रिकेट शौकीनांसाठी व क्रिकेट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. कर्जत-जामखेड मतदार संघातील राशीन येथे भव्य स्टेडियमचे उद्घाटन होणार असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. त्यासाठी, 3 ऑक्टोबर रोजी रोहित शर्मा (Rohit Sharma), आमदार रोहित पवार यांच्यासह राशीनमध्ये येणार आहे. विशेष म्हणजे कर्जतमध्येही स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा रोहित पवार यांनी केलीय  

मी स्वतः रोहित शर्मा चा फॅन आहे, त्यांच्या अकॅडमीच्या मदतीने ग्रामीण भागतील खेळाडूंना व्यासपीठ मिळत आहे, रोहित शर्मा यांनी मोठं मन दाखवून त्यांची अकॅडमी सुरू करत आहेत. ग्रामीण भागतील रोहित शर्मा यांची ही पहिलीच अकॅडमीआहे, जी रयत शिक्षण संस्थेच्या जागेत असणार आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. त्यामुळे, रोहित शर्माची क्रिकेट अकॅडमी कर्जत-जामखेड मतदारसंघात होत आहे. कर्जत शहरात पण स्टेडियम होत आहेत, येथे रणजी सामने होतील असा आमचा मानस आहे. रयत शिक्षण संस्थेचे पण ग्राउंड उभा करत आहोत. सीएसआर फंडातून हे सगळं उभा करण्यात येणार आहे. येथील अकॅडमीत होतकरू खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. क्रिकेट, कुस्ती आणि उरेलेल्या जागेत शाळा बांधली जाणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघ आणि अहमदनगर जिल्ह्यातील मुलांना याचा फायदा होईल, असेही पवार यांनी म्हटले. दरम्यान, राशीन येथील क्रिकेट स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार आहे, तर कर्जत जामखेड स्टेडियमला तेथील लोकांना विचारून नाव देण्याचं ठरविण्यात येईल, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. 

निष्ठावंतांना प्राधान्य

मी एवढच सांगतो पवार साहेब राज्यात फिरत आहेत,राज्यात माविआसाठी सकारात्मक वातावरण आहे. बरेचजण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, पण पहिल्यांदा निष्ठावंतांना प्राधान्य दिले जाईल. विधानसभा निवडणुकांसाठी वातावरण चागलं दिसत आहे. काही लोक चर्चेमुळे नाराज असतील, उगीच कोणीही चर्चेमुळे नाराज होऊ नये, पवार साहेब जो निर्णय घेतील तो काही तरी विचारुन घेतील, तो निर्णय घेताना अनेक ठिकाणी साहेब निष्ठावंतांना नाराज करणार नाहीत, असेही रोहित पवार यांनी विधानसभा उमेदवारीबाबत म्हटले. 

गणवेशच्या क्वॉलिटीवरुन सरकारवर निशाणा

माझ्या शर्टचा रंग सुद्धा गणवेशाचा कलरचा,मला मुख्यमंत्र्यांनी गणवेश दिला नाही. आमदारांना दिलेल्या शब्द मुख्यमंत्री पाळत नाहीत, तर सामान्यांना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही म्हणजे गरिबांची कुठेतरी थट्टा केली आहे. मी फोटो ट्विट केला आहे, सिलाई पण कशी झाली आहे, महायुतीसारखे कपडे शिवले आहेत. गुजरातकडून कापड घेता येऊन, ड्रेसपासून मुल वंचित आहेत. सरकारला गरीब मुलांच्या कपड्यांवर मलिदा खायचा आहे, ही चिंतेची बाब आहे, असेही रोहित पवार यांनी गणवेशबाबत म्हटलं. 

हेही वाचा

'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress on Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसची आघाडी,1ॲाक्टोबरपासून इच्छुकांच्या मुलाखतीMumbai Superfats News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या : 30 Sep 2024Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारलाMahavikas Aghadi Meeting : विदर्भातील काही जागांवर महाविकास आघाडीची चर्चा रखडली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
Embed widget