एक्स्प्लोर

निवडणुकीत रिस्क नको! घोडेबाजार टाळण्यासाठी नागपूरचे भाजप नगरसेवक गोवा टूरवर 

Vidhan Parishad Election Nagpur : नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूरची निवडणूक मात्र होणार आहे.

Vidhan Parishad Election Nagpur : नागपूर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मात्र होणार आहे. काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. निवडणुकीआधी 34 वर्ष भाजपसोबतचा प्रवास संपवत भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार आहे. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे मैदानात आहेत. (Chhotu Bhoyar vs Chandrashekhar Bawankule) उमेदवारी जाहीर केली आहे.

MLC Elections : काँग्रेसकडून छोटू भोयर यांना विधानपरिषदेची उमेदवारी, बावनकुळेंविरोधात लढणार

 भाजप नगरसेवकांचा एक मोठा समूह गोव्यासाठी रवाना
विधानपरिषदेची नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक रंगात आली आहे. नागपूर महापालिकेतील भाजप नगरसेवकांचा एक मोठा समूह गोव्यासाठी रवाना झाला आहे. काल रात्री उशिरा नागपूर विमानतळावरून भाजप नगरसेवक गोवासाठी रवाना झाले.  निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, दगा फटका होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून भाजपने नगरसेवकांना छोट्या छोट्या समूहात विविध ठिकाणी ठेवण्याचे ठरविले असून त्याअंतर्गत पहिला समूह गोव्याला रवाना झाला आहे. 

'चंद्रशेखर बानकुळेंनी मला गंडवलं, 34 वर्ष साथ, तरीही पक्षाकडून अन्याय, आता राम राम करतोय', विदर्भात बड्या नेत्याचा भाजपला रामराम

काँग्रेस आमच्या लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, आमच्या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून खबरदारी म्हणून भाजपचे नगरसेवक एकत्रित राहण्यासाठी जात असल्याची प्रतिक्रिया भाजपचे महापालिकेचे नेते अविनाश ठाकरे यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे छोटू भोयर यांच्यात लढत होत असून काँग्रेसने भाजप नगरसेवक छोटू भोयर यांना उमेदवारी देऊन आधीच भाजपला झटका दिला आहे. पुढे निवडणुकीत छोटू भोयर किंवा काँग्रेसकडून आपले नगरसेवक फोडले जाऊ नये ही भीती भाजपला आहे. त्यामुळेच भाजप नगरसेवकांना विविध ठिकाणी पाठवले जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena UBT : डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंना उमेदवारी, ठाकरेंच्या शिवसेनेत पहिला राजीनामा पडला,हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल
ठाकरेंकडून 65 उमेदवार जाहीर, काही तासाताच पहिला राजीनामा पडला, हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल  
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
Kamakhya Temple : 108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 24 October 2024माझं गांव, माझा जिल्हा  Majha Gaon Majha Jilha at 630AM 24 Oct 2024Maharashtra Vidhan Sabha 9 Numerology : राजकीय घाई 'नऊ'ची नवलाई Special ReportZero Hour Full : मविआचा फॉर्म्युला ते अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात, सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena UBT : डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंना उमेदवारी, ठाकरेंच्या शिवसेनेत पहिला राजीनामा पडला,हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल
ठाकरेंकडून 65 उमेदवार जाहीर, काही तासाताच पहिला राजीनामा पडला, हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल  
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
Kamakhya Temple : 108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 33 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात
ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 33 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात
Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
Embed widget