(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MLC Elections : काँग्रेसकडून छोटू भोयर यांना विधानपरिषदेची उमेदवारी, बानकुळेंविरोधात लढणार
नागपूर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर कऱण्यात आलं आहे
Chhotu Bhoyar vs Chandrashekhar Bawankule : नागपूर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर कऱण्यात आलं आहे. सोमवारी भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 34 वर्ष भाजपसोबतचा प्रवास त्यांनी संपवला होता. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार आहे. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर केली होती. विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपस्थित होते. सुलेखाताई कुंभारे, महापौर दयाशंकर तिवारी आणि अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे नागपूरमध्ये भोयर विरुद्ध बावनकुळे अशी थेट लढत होणार आहे.
सोमवारी नागपूर शहर काँग्रेसच्या देवडिया काँग्रेस भवन या कार्यालयात रवींद्र भोयर यांनी आपला 34 वर्षांचा भाजप सोबतचा प्रवास थांबवून काँग्रेसवासी झाले. यावेळी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व ऊर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्यासह नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि नागपूर ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक हे ही उपस्थित होते. विशेष म्हणजे देवडिया काँग्रेस भवन मध्ये काँग्रेस पक्षाची बैठक सुरू असताना रवींद्र भोयर तिथे पोहोचले आणि त्यांनी काँग्रेस पक्षाची प्राथमिक सदस्यता घेतली. रवींद्र भोयर हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून चार वेळेला ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ते आणि त्यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अनेक दशकांपासून जोडलेले आहे. काँग्रेसनं भोयर यांना अपेक्षाप्रमाणे विधान परिषद निवडणुकीचं तिकिट दिलं आहे.
Congress' Ravindra Prabhakar Bhoyar to contest the ensuing biennial election to the Maharashtra Legislative Council from Nagpur Local Authorities' Constituency. pic.twitter.com/Ll7ZnEytQq
— ANI (@ANI) November 22, 2021
संबधित बातम्या :