Sushma andhare : नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळत होता का? एक्साईज मंत्री काय करतोय? सुषमा अंधारेंचा सडकून प्रहार
Shivsena Dasara Melava live update Sushma andhare : नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची ड्रग्ज सापडत असताना नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळत होता का? अशा शब्दात त्यांनी दादा भुसेंवर प्रहार केला.
Shivsena Dasara Melava live update : शिवसेना ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ असलेल्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेना दसरा मेळाव्यातून पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे यांच्यावर कडाडून प्रहार केला. नाशिकमध्ये ललित पाटील ड्रग्ज रॅकेट समोर आल्यानंतर सुषमा अंधारे यांनी चौफेर हल्ला चढवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातून सुषमा अंधारे यांनी दादा भुसे आणि एक्साईज मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सडकून प्रहार केला. नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची ड्रग्ज सापडत असताना नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळत होता का? अशा शब्दात त्यांनी दादा भुसेंवर प्रहार केला.
महाराष्ट्र ड्रजमुक्त झाला पाहिजे, महाराष्ट्र नशामुक्त झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्र हा उडता पंजाब होता कामा नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यावेळी त्यांनी बोलताना महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ड्रग्ज कारवाईवरती भाष्य केले. त्या म्हणाल्या की, नाशिकमध्ये 300 कोटींचा ट्रेक सापडलं, सोलापुरात 16 कोटींचं सापडलं, मुंबईमध्ये 71 कोटींचं कोकेन सापडलं, छत्रपती संभाजी नगरात 500 कोटींचं ड्रग्ज सापडले, पालघरमध्ये ड्रग्जचा कारखाना सापडला. त्यामुळे आपल्या घरात व्यसन झालं नसलं पाहिजे, असं प्रत्येक महिलेला वाटतं, कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये असं वाटत असतं, अशावेळी नाशिकचा पालकमंत्री काही गोट्या खेळतं होता का? अशी विचारणा त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या