एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana online apply : मोबाईलवरुन लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा? स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करावा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण मोबाईलच्या मदतीनेही हा अर्ज भरता येऊ शकतो.

मुंबईसध्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) राज्यभर चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान, या योजनेसंदर्भात महिलांना अनेक प्रश्न आहेत. या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? इथपासून ते अर्ज कसा कारवा? याबाबत महिला विचारत आहेत. याच पार्श्वभूमीवर तुमच्या हातात असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता? त्यासाठी प्रक्रिया काय आहे? हे जाणून घेऊ या... 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही आता मोबाईल द्वारे अर्ज भरू शकता. त्यासाठी कोण कोणती कागदपत्रे हवी. आणि फॉर्म भरण्याची योग्य पद्धत काय? याची ए टू झेड माहिती जाणून घेऊ या...

१) सर्वात आधी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअर वरती नारीशक्ती दूत हे ॲप सर्च करायचंय आणि ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. या ॲपद्वारे तुम्ही कित्येक जणांचे अर्ज भरू शकता. 

२) आता ॲप इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करा. 

३) आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ओटीपी आणि टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक करून या अॅप्लीकेशनला लॉगिन करून घ्यायचे आहे. 

४) त्यानंतर आता तुमच्यासमोर प्रोफाइल अपडेट करा असा ऑप्शन दिसेल.  

५) त्यात तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, ईमेल आयडी, तुमचा जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला, बचत गट अध्यक्ष, गृहिणी, ग्रामसेवक या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत.

६) आता तुमचे प्रोफाईल अपडेट झाले असेल. 

७) आता तुम्हाला नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्याय वरती क्लिक करायचे आहे. 

८) त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला या अॅप्लिकेशनला लोकेशनची परमिशन द्यावी लागेल. 

९) आता तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म येईल. हा फॉर्म तुम्हाला कोणतीही चूक न करता भरायचा आहे. तुमच्या आधार कार्ड वरती जी माहिती आहे तीच माहिती तुम्हाला येथे टाकायची आहे. 

१०) या तुम्हाला आधार कार्डवरील संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचे गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक आणि तुम्ही इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्याची माहिती भरायची आहे. 

११) जर तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करा.

१२) आता खाली तुमची वैवाहिक स्थिती काय आहे ते टाकायचे आहे. 

१३) त्यासोबतच तुम्हाला महिलेचे लग्न आधीचे संपूर्ण नाव ते येथे नमूद करायचे आहे. 

१४) जर महिलेचा जन्म परप्रांतात झाला असेल हो निवडा. आणि जर महाराष्ट्रात झाला असेल तर नाही या पर्यायावर क्लिक करा. 

१५) आता खाली अर्जदाराच्या बँकेत तपशील तुम्हाला भरायचा आहे. त्यात अकाउंट नंबर, बँकेचे नाव, आयएफसी क्रमांक, आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरायची आहे. 

१६) आता खाली तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करण्याचं पर्याय आला असेल. 

१७) त्यात आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, आणि महिलेचा जन्म जर पर प्रांतामध्ये झाला असेल तर त्याचा दाखला ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत.  

१८) आता सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराच्या फोटोचा ऑप्शन आला असेल.

१९) तुम्हाला या ठिकाणी कोणताही फोटो अपलोड करायचा नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचा आहे. 

२०) फोटो काढून अपलोड झाल्यावर तुम्हाला खाली "Accept हमीपत्र डिस्क्लेमर" यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहेत याची माहिती आली असेल. आता तुम्हाला ते अॅक्सेप्ट करायचे आहे. 

२१) त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा चेक करून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका. 

२२) अशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.

हेही वाचा :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड धावपळ; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Embed widget