![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Heat Wave : आजपासून राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज, पिकांच्या सुरक्षेबाबत कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन
Heat Wave : हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजपासून म्हणजे 13 ते 15 मार्चदरम्यान राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे
![Heat Wave : आजपासून राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज, पिकांच्या सुरक्षेबाबत कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन Maharashtra Weather Rain warning in some parts of the state from today Heat Wave : आजपासून राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज, पिकांच्या सुरक्षेबाबत कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/fbb8c0d6c5c1cd69e976165bd56e070c1677647072353457_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Heat Wave : राज्यातील तापमानात (Tempreture) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजपासून म्हणजे 13 ते 15 मार्चदरम्यान राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी (Farmers) बांधवांनी पावसाची शक्यता असल्यानं हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
या भागात पावसाचा अंदाज
मागील काही दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. सध्या पश्चिमेकडून येणारं बाष्पयुक्त वारे, तसेच वाऱ्यांच्या प्रभावामुळं उत्तर प्रदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळं शहरात आणि ग्रामीण परिसरात पावसासाठी योग्य वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं शहरात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात जिल्ह्यात 13 ते 15 मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहील. तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
पुण्यासह ग्रामीण भागात पावसाचा अंदाज
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसानंतर पुणेकरांची उष्णतेपासून सुटका होणार आहे. उन्हाचा चटका काही प्रमाणात कमी होणार आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यासह ग्रामीण भागात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. विजांच्या कडकडाटासह, वादळी वारे देखील होते. दोन दिवसापासून संध्याकाळच्यावेळी पुण्यात ढगाळ वातावरण होत आहे. आता पावसाची शक्यता वर्तवल्यानं पुणेकरांची उष्णतेपासून सुटका होणार आहे.
काही भागात उन्हाच्या तीव्र झळा
भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार मार्चमधील उन्हाच्या झळांची तीव्रता आता राज्यभर जाणवू लागली आहे. काल (11 मार्च) कोकण आणि गोव्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. तर उर्वरित ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्यानजीक पोहोचले आहे. सांताक्रूझ (मुंबई) येथे सर्वाधिक 37.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची, तर पुण्यात 14.7 एवढ्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये सांताक्रूझ (37.5), रत्नागिरी (37.4), पणजी (36.0), सोलापूर (36.2), उस्मानाबाद (35.3), परभणी आणि यवतमाळमध्ये (35.0), नांदेड (35.02), अकोला, अमरावती, वाशीममध्ये (36.02), ब्रह्मपुरी (36.9), वर्धा (35.4) या ठिकाणी कमाल तापमानाने 35 अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Pune Temperature : पुण्यात पुढील दोन दिवसानंतर पावसाची शक्यता; शेतकरी चिंतेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)