एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री पदाबाबत विचारल्यानंतरही शिंदेंचं बंड, बंडखोरांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही : आदित्य ठाकरे 

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  20 मे रोजी मुख्यमंत्री पदाबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी टाळाटाळ केली होती, असे वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं.

Aaditya Thackeray : तिथे गेलेले 15 ते 16 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. फुटीरवाद्यांना महाराष्ट्र कदापी माफ करणार नाही. ज्यांना जायचे आहे, त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जे खातं असतं ते खातं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. मग त्यांना कमी काय केलं असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  20 मे रोजी मुख्यमंत्री पदाबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी टाळाटाळ केली होती. त्यानंतरही त्यांनी 20 जूनला बंड केल्याचे ठाकरे म्हणाले. बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला.
 
प्रत्येक आमदार जरी तिथे गेला तरी विजय हा शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केली. सांताक्रूझमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात  मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते.  आसाममध्ये एकीकडे पूर आला आहे. तिथे लोकांना संरक्षण द्यायला हवे होते. पण हे संरक्षण बंडखोरांना दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायची त्यांची लायकी नाही. असती तर तुम्ही बंड करुन सूरतला गेला असता का असेही ते म्हणाले. खरोखर यांच्यात ताकद, लाज  स्वाभिमान असता तर समोर येऊन त्यांनी बंड केलं असतं. महाराष्ट्रात लपायची हिंमत नाही म्हणून सूरतला पळाले आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात गेल्यावर सभेत उठून एका शेतकऱ्यानं मला सांगितले की भुमरे पाच टर्म आमदार झाले आहेत, त्यांना मंत्रीपदाची संधी द्या. त्यानंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत बोललो. त्यानंतर संदीपान भुमरे यांना मंत्रीपद दिल्याचा खुलासा आदित्य ठाकरे यांनी केला. दरम्यान, धनुष्यबाण हा आपलाच राहणार, शिवसेना पक्ष आणि प्रेम आपलच राहणार. बंडखोरांपुढे दोनच पर्याय आहेत. एकतर प्रहार पक्षात विलीन व्हा, नाही तर भाजपमध्ये विलीन होणं हेच पर्याय असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. परत यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही. त्यांना निवडणुकीत पाडणार असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि परत निवडून येऊन दाखवा असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSaif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
नव्या 'उदय'चं भाकित, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, संजय राऊत म्हणाले शिंदे वेळीच सावध झाले अन् झाकली मूठ....
विजय वडेट्टीवारांचं नव्या 'उदय'चं भाकित, संजय राऊतांनी उदय सामंतांचं नाव घेत आमदारांचा आकडा सांगितला
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Embed widget