एक्स्प्लोर

Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीचं ठरलं, मात्र महाविकास आघाडीचं अजूनही आडलं; विद्यमान काँग्रेस आमदारांची चर्चाच नाही!

Kolhapur Uttar Vidhan Sabha : अनेक मतदारसंघांमध्ये लढती जवळपास निश्चित झाल्या असल्या, तरी कोल्हापूर उत्तर आणि राधानगरी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र अजूनही साशंकता कायम आहे.

Kolhapur Uttar Vidhan Sabha : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) रणशिंग फुंकलं गेलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी राज्याचे नवीन कारभारी कोण असतील याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये खनाखणी सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur district assembly constituency)महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अजूनही उमेदवारीवरून गुंता कायम आहे. अनेक मतदारसंघांमध्ये लढती जवळपास निश्चित झाल्या असल्या, तरी कोल्हापूर उत्तर आणि राधानगरी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र अजूनही साशंकता कायम आहे.

कोल्हापूर मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार?

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ (Kolhapur North) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाकडूनही दावा करण्यात आला आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार काँग्रेसच्या जयश्री जाधव आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा मतदारसंघ (Kolhapu महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ठाकरे गटाकडे येणार की काँग्रेस आपल्याकडेच ठेवणार याची चर्चा सर्वाधिक रंगली आहे. ठाकरे गटाकडून हा मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या ठरलेल्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार विद्यमान आमदार ज्या पक्षात असेल ती जागा त्या पक्षाला असं समीकरण ठरलं आहे. जर या समीकरणाचा विचार केला तर ही जागा काँग्रेसलाच सुटू शकते. मात्र, काँग्रेसकडून अजूनही जयश्री जाधव यांना उमेदवारी मिळणार नसेल, तर तो चेहरा कोण याची चर्चा अजूनही कायम आहे. त्यामुळे एखादा सरप्राईज चेहरा दिला जाणार की छत्रपती घराण्यातून मधुरिमा राजे छत्रपती यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार? याची सुद्धा चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. 

राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित?

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार याबाबत मात्र अजून स्पष्टता आलेली नाही. 2022 मध्ये टनिवडणुकीत भाजपने या ठिकाणी चांगली लढत दिली होती. त्यामुळे स्वाभाविकपणे या मतदार संघावरती भाजपकडून सुद्धा दावा करण्यात आला आहे. भाजपकडून महेश जाधव, सत्यजित कदम आणि खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत. मात्र राजेश क्षीरसागर या मतदारसंघातून आपली उमेदवारी निश्चित असल्याचे म्हणत आहेत. 

कोल्हापूर उत्तरमध्ये दोन्ही आघाड्यात कलगीतुरा 

कोल्हापूर उत्तरमधून महायुतीमध्ये ज्या पद्धतीने रस्सीखेच सुरु आहे तशीच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाकडून संजय पवार आणि रविकिरण इंगवले इच्छूक आहेत. उमेदवारीवरून दोघांमधील विसंवाद सुद्धा समोर आला होता. तुलनेत काँग्रेसमध्ये वाद नसला, तरी उमेदवार कोण? ही चर्चा आजही कायम आहे. आमदार सतेज पाटील कोणाच्या पारड्यात मत टाकणार यावर उमेदवार निश्चित होईल, यात शंका नाही.

दुसरीकडे महायुतीमध्ये राजेश क्षीरसागर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये शक्तीप्रदर्शन करताना दक्षिणमध्येही ताकद असल्याचे सांगत महाडिकांना डिवचले होते. त्यानंतर खासदार महाडिक यांनी सुद्धा आमची उत्तरला 80 हजार मते असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले होते.  

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये काठावर मताधिक्य 

कोल्हापूर लोकसभेला आजघडीला कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर आणि विधानपरिषदेतील दोन आमदार असे पाच आमदार आहेत. स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांनी करवीरमध्ये दिलेल्या मताधिक्याने महाराजांना विजय निश्चित झाल्याचे दिसून येते. मात्र, कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये शाहू महाराजांना अपेक्षित मताधिक्य मिळालेलं नाही. कोल्हापूर दक्षिणमधून अवघ्या 6 हजार 702 मतांची आघाडी शाहू महाराजांना मिळाली. कोल्हापूर उत्तरमध्ये 14 हजार 528 मतांची आघाडी मिळाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात विद्यमान काँग्रेस आमदार आहेत. दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील, तर उत्तरमध्ये जयश्री जाधव आमदार आहेत. शिंदे गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजेश क्षीरसागर यांनाही हा धोक्याचा इशारा आहे. 

गेल्या तीन निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमध्ये काय घडलं?

  • 2009 मध्ये छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव करुन राजेश क्षीरसागर पहिल्यांदा आमदार. क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा 3687 मतांनी पराभव केला
  • 2014 साली पुन्हा राजेश क्षीरसागर हे 22 हजार 421 मताधिक्य घेऊन दुसऱ्यांना आमदार झाले. त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या सत्यजित कदम यांचा पराभव केला. 
  • 2019 साली राजेश क्षीरसागर यांचा 15 हजार 199 मतांनी पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांनी विजय खेचून आणला होता. 
  • 2022 मध्ये चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने कोल्हापूर उत्तरमध्ये पोटनिवडणूक झाली. यामध्ये जयश्री जाधव विजयी 18 हजार 901 मतांनी झाल्या होत्या. त्यांनी सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut : देशभरात 'इमर्जन्सी' लागणार, अभिनेत्री कंगना राणौतने दिली गुडन्यूज, सेन्सॉर बोर्डाची चित्रपटाला मंजुरी
देशभरात 'इमर्जन्सी' लागणार, अभिनेत्री कंगना राणौतने दिली गुडन्यूज, सेन्सॉर बोर्डाची चित्रपटाला मंजुरी
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात जागावाटपात शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येणार??
कोल्हापूर जिल्ह्यात जागावाटपात शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येणार??
धक्कादायक ! खासगी रुग्णालयांत तब्बल 1169 सीजर, रुग्णांची लूट; डॉक्टरांना आरोग्य विभागाची नोटीस
धक्कादायक ! खासगी रुग्णालयांत तब्बल 1169 सीजर, रुग्णांची लूट; डॉक्टरांना आरोग्य विभागाची नोटीस
दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून 2 उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी
दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून 2 उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Dhobale : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंची घरवापसी होणार? Supriya Sule यांची घेतली भेटRahul Aher on Vidhan Sabha | चांदवड-देवळा मतदारसंघातून राहुल आहेर  यांची निवडणुकीतून माघारAshish Shelar On Aaditya Thackeray | पुरावे द्या नाहीतर राजकारण सोडा, शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | Maharashtra Election

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kangana Ranaut : देशभरात 'इमर्जन्सी' लागणार, अभिनेत्री कंगना राणौतने दिली गुडन्यूज, सेन्सॉर बोर्डाची चित्रपटाला मंजुरी
देशभरात 'इमर्जन्सी' लागणार, अभिनेत्री कंगना राणौतने दिली गुडन्यूज, सेन्सॉर बोर्डाची चित्रपटाला मंजुरी
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात जागावाटपात शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येणार??
कोल्हापूर जिल्ह्यात जागावाटपात शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येणार??
धक्कादायक ! खासगी रुग्णालयांत तब्बल 1169 सीजर, रुग्णांची लूट; डॉक्टरांना आरोग्य विभागाची नोटीस
धक्कादायक ! खासगी रुग्णालयांत तब्बल 1169 सीजर, रुग्णांची लूट; डॉक्टरांना आरोग्य विभागाची नोटीस
दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून 2 उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी
दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून 2 उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी
Miraj Vidhan Sabha : मिरजेत पुन्हा कमळच! सांगलीच्या पालकमंत्र्यांनी सलग पाचव्यांदा विधानसभेसाठी शड्डू ठोकला
मिरजेत पुन्हा कमळच! सांगलीच्या पालकमंत्र्यांनी सलग पाचव्यांदा विधानसभेसाठी शड्डू ठोकला
Sangram Jagtap : गुंडगिरीच्या राजकारणाबाबत संग्राम जगताप यांचं रोखठोक भाष्य; म्हणाले, '...तर जनतेने तिसऱ्यांदा संधी दिली नसती'
गुंडगिरीच्या राजकारणाबाबत संग्राम जगताप यांचं रोखठोक भाष्य; म्हणाले, '...तर जनतेने तिसऱ्यांदा संधी दिली नसती'
लक्ष्मण ढोबळे भाजपला देणार धक्का? लवकरच शरद पवार गटात करणार प्रवेश? सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
लक्ष्मण ढोबळे भाजपला देणार धक्का? लवकरच शरद पवार गटात करणार प्रवेश? सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
Chandrashekhar Bawankule on Suresh Halvankar : भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांनी निष्ठेला हाच का न्याय? विचारताच चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांनी निष्ठेला हाच का न्याय? विचारताच चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
Embed widget