पंतप्रधान मोदींनी सहकाराला जगवण्याचं काम केलं : देवेंद्र फडणवीस
अहमदनगर येथील प्रवरानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या सहकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह उपस्थित आहेत.
मुंबई : सहकार चळवळ मोडीत निघाली असे म्हणत आहेत तेच सहकारी साखर कारखाने विकत घेत आहेत. अशी अप्रत्यक्ष टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर नान न घेता केली. सहकारी साखर कारखाने नेत्यांच्या घशात घातले अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराला जगविण्याचं काम केलं असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अहमदनगर येथील प्रवरानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या सहकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह (Minister Amit Shah maharashtra Tour) उपस्थित आहेत. यावेळी फडणवीस यांनी अनेक मुद्दे मांडले.
"अमित शाह हे सहकारी चळवळीतून तायर झालेले नेते आहेत. एमएसपी लावल्याने साखर कारखाने तरले आहेत. अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटानं इथेनॉलबाबतचे सर्व निर्णय घेतले. इथेनॉल निर्मितीमुळे कारखान्यांची स्थिती सुधारली. शिवाय इथेनॉलच्या नव्या धोरणामुळे साखर कारखान्यांचे दिवस पालटले. कारखान्यांचा होणार तोटा इथेनॉलमुळे भरून निघेल. साखर कारखान्यांनी 2 पैसे दिले तर त्यांना अमित शाह यांनी इनकम टॅक्सच्या जाचातून सोडवलं आणि 30 वर्षाचा प्रश्न मार्गी लागला." असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह (Minister Amit Shah maharashtra Tour) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने शाह यांच्या या दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर ते प्रवरानगर इथल्या देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहिले आहेत. या मेळाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर इथं विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने अमित शाह पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत.