एक्स्प्लोर

रामदास कदमांच्या गंभीर आरोपांवर अनिल परब यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अनिल परबांना (Anil Parab) मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षासोबत गद्दारी करत आहेत, असा आरोप रामदास कदमांनी (Ramdas Kadam) केला आहे. अनिल परब यांना यासंदर्भात विचारलं असता त्यांनी काय म्हटलंय पाहूयात...

Shiv Sena Leader Ramdas Kadam allegation on Anil Parab : शिवसेनेतील अंतर्गत कलहाला अखेर वाचा फुटली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी परिवहन नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज पत्रकार परिषदेत बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं की, अनिल परब यांनी मनसे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांना हाताशी धरुन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला आहेत. स्थानिक आमदारांना डावलून सातत्याने आमच्या मुळावर उठण्याचे काम अनिल परब यांनी केले आहे. गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळले पाहिजे. अनिल परबांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षासोबत गद्दारी करत आहेत, असा आरोप रामदास कदमांनी केला आहे. यावर अनिल परब यांनी मात्र बोलणं टाळलं आहे. अनिल परब यांना यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, मी याबाबतीत काही बोलू इच्छित नाही. माझ्यावर काहीही आरोप केले तरी मी काही बोलणार नाही. मी एक शिवसैनिक आहे. ते शिवसेना नेते आहेत. याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल, असं परब यांनी म्हटलं आहे. 

गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळले पाहिजे- रामदास कदम

रामदास कदम यांनी म्हटलं आहे की, स्थानिक आमदारांना डावलून सातत्याने आमच्या मुळावर उठण्याचे काम अनिल परब यांनी केले आहे. गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळले पाहिजे. अनिल परबांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षासोबत गद्दारी करत आहेत. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनिल परबांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र करुन दोन उमेदवार निश्चित केले आहेत. त्याबाबत पक्षाला कळवल्यानंतर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या निवडणुकीसाठी अनिल परब यांनी त्यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये बैठक बोलवली होती. त्याला सुनील तटकरे आणि शिवसेना विरोधात काम करणारे सूर्यकांत दळवी यांना बोलावले होते. पक्षाची निष्ठा आम्हाला शिकवणारे उदय सामंत यांनाही त्यांनी बोलवले होते. त्यानंतर तिकिट वाटप करुन राष्ट्रवादीला पहिले अडीच वर्षाचे नगराध्यक्ष पद दिले. शिवसेना राष्ट्रवादीकडे गहाण ठेवणारे अनिल परब गद्दार की रामदास कदम गद्दार? शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घश्यामध्ये टाकणारे अनिल परब निष्ठावान कसे असू शकतात, असा सवाल कदमांनी केला आहे.

रामदास कदम म्हणाले की,  मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनाधिकृत होता म्हणून तो पाडला गेला.  काही कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात घोषणा केली.  त्यांच्या मागे कोण होतं हे मला माहित होतं. मी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो मी कधीच किरीट सोमय्या यांच्याशी बोललो नाही. मी कधीही पक्षाच्या विरोधात काम केलं नाही. 

रामदास कदम म्हणाले की, तीन चार महिन्यापासून माझ्या संदर्भात मीडिया संदर्भात उलट सुलट चर्चा सुरु आहे.  माझी भूमिका सर्वांना माहीत व्हावा म्हणून माझी बाजू मांडत आहे. मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  अनिल परब यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे. पालकमंत्री म्हणून त्यांचा संपर्क नाही.  मी त्यांच्या हॉटेलवर बोललो म्हणून मी पक्षाच्या विरोधात बोललो नाही, असं ते म्हणाले. अनिल परबांनी मुंबईतून निवडून येऊन दाखवावं. माझ्या मुलाला तिकिट मिळू नये म्हणून ते राष्ट्रवादीच्या संजय कदमांना मातोश्रीवर घेऊन आले. मात्र उद्धवजींनी त्यांचं ऐकलं नाही. रत्नागिरीचे पालकमंत्री झाल्यावर सुडाची भावनेनं काम केलं, असं ते म्हणाले. 

रामदास कदम म्हणाले की, संजय कदम यांना मी मोठं केलं. पण त्याने पक्ष सोडल्यानंतर भगवा झेंडा पायाखाली तुडवून जाळला.  त्यांना आता हाताशी धरलं जात आहे.  आमचे निष्ठावंत उदय सामंत यांना बोलावलं. आता आम्हाला त्यांच्याकडून निष्ठा शिकावी लागत आहे. अनिल परब शिवसेनेला गहाण ठेवत आहेत.  मग गद्दार कोण आहे, असा सवाल त्यांनी केला.  एसटी कर्मचारी संप सुरु आहे आणि आत्महत्या होत आहेत.  पण अनिल परब यांना वेळ नाही.  अनिल परब यांची भाषा अशी आहे की ते राष्ट्रवादी नेता म्हणून बोलत आहेत. शिवसेना म्हणजे काय हे आता आम्हाला उदय सामंत सांगत आहेत.  52 वर्ष आम्ही या पक्षासाठी खर्च केले आहे, असं ते म्हणाले.  

कदम म्हणाले की, अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मी ठामपणे सांगतो फक्त 15 ऑगस्ट आणि 26  जानेवारीला जिल्ह्यामध्ये येतात. बाकी सपूर्ण जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडून दिला आहे. अनिल परबांचा जिल्ह्यासोबत कुठलाही संपर्क नाही. तालुका प्रमुखाचे नावही त्यांना माहिती नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. अनिल परब यांच्या हॉटेलविरोधात बोलणे म्हणजे मी पक्षाविरोधात बोलणे असे सांगितले जाते. मिलींद नार्वेकर यांचा बंगला अनाधिकृत असल्याने पाडण्यात आला. यांनी स्वतःचे हॉटेल बांधायचे आणि मग ते पाडण्यात आले की मग शिवसेनेच्या एका नेत्याला कायमचे उद्धवस्त करण्याचे काम करायचे. यांच्या खाजगी मालमत्तेचा शिवसेनेसोबत काय संबंध? माझ्या विरोधात दसरा मेळाव्यामध्ये ज्या घोषणा दिल्या गेल्या त्याचा मी निषेध करतो. मी आयुष्यभर शिवसेनेसाठी संघर्ष केलेला मावळा आहे. असे असताना फक्त अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधात बोलल्यामुळे माझ्याविरोधात घोषणा दिल्या गेल्या. याच्यापाठीमागे कोण आहे मला सगळे माहित आहे, असं ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ- रामदास कदम काय म्हणाले...

संबंधित बातम्या

'अनिल परब गद्दार! राष्ट्रवादीच्या सोबतीनं शिवसेना संपविण्याचा घाट, उद्धवजी लक्ष द्या', रामदास कदमांचा लेटर बॉम्ब

महत्त्वाच्या बातम्या

सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
लवकरच शेतकऱ्यांना कर्ज नील झाल्याचे सर्टीफीकेट मिळणार, दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ होणार, मंत्री दत्रात्रय भरणेंची माहिती
लवकरच शेतकऱ्यांना कर्ज नील झाल्याचे सर्टीफीकेट मिळणार, दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ होणार, मंत्री दत्रात्रय भरणेंची माहिती
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget