(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रासाठी काशीइतकीच पवित्र : अमित शाह
सहकारासाठी महाराष्ट्राची भूमी ही काशीएवढीच पवित्र भूमी असल्याचे वक्तव्य देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
अहमदनगर : महाराष्ट्राची भूमी ही सहकारासाठी काशीएवढीच पवित्र भूमी असल्याचे वक्तव्य देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. सध्या सहकार चळवळीला मदतीची गरज आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे सहकार खाते काढले असल्याचे शाह म्हणाले. सहकारातील दोष आपल्याला काढावे लागतील. पण सहकार चळवळीवर ही वेळ का आली? असा सवालही त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्रमध्ये जिल्हा बँक या आदर्श मॉडेल असल्याचे शाह यांनी यावेळी सांगितले.
मला आनंद आहे हा प्रवरा नगर कारखाना आजही सहकारी आहे. नाहीतर अनेक कारखाने खासगी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे खातं का काढलं हे सांगण्यासाठी मी येथे आलो असल्याचे शाह यावेळी म्हणाले. मोदी सरकारने साखर कारखान्याच्या अभ्यास केला आणि प्रश्न सोडवले असल्याचे शाह यावेळी म्हणाले.
'मै यहाँ तोडने नहीं जोडने आया हू'
महाराष्ट्रातील जे साखर कारखाने संकटात आहेत, त्यांना पुन्हा उभा करण्याचे काम आम्ही करू. पुन्हा कोणताही सहकारी कारखाना खासगी होणार नाही याची दक्षता घेऊ असेही शाह यावेळी म्हणाले. मी सहकारमंत्री झाल्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रात काय होणार? सहकारत काय होणार? पण 'मै यहाँ तोडने नहीं जोडने आया हू' असेही ते म्हणाले. राज्य सरकार फक्त काहीच कारखान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करते. विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांना राज्य सरकार सहकार्य करत नाही. काही जणांना यासाठी दिल्लीला यावे लागलते असे शाह म्हणाले. राज्य सरकारने सहकारी क्षेत्रात राजकारण न करता संकटात सापडलेल्या कारखान्यांना मदत करावी असे ते म्हणाले. आम्ही बँक क्षेत्राला वाचवण्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आम्ही कोणताही कमिटी नेमणार नसल्याचा उल्लेख शाह यांनी केला. तसेच सहकार क्षेत्राला पूर्ण मदत करण्याचे आश्वासनही शाह यांनी यावेळी दिले.
सहकारात पारदर्शकता आणावी लागणार
सहकारामुळे सबका साथ सबका विकास यशस्वी होणार आहे. सहकारी क्षेत्र पुढे घेऊन जाण्यासाठी जी काही मदत लागेल ती पूर्ण मदत मोदी सरकार करणार असल्याचे शाह म्हणाले. पद्मश्री विठ्ठराव विखे पाटील यांच्या कार्याचा देखील अमित शाह यांनी गौरव केला. त्यांनी उभ केलेली सहकारी चळवळ १०० वर्ष पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सहकारासाठी मोदी सरकार २४ तास ३६५ दिवस उपलब्ध असणार आहे. मात्र, सहकारात आता पारदर्शकता आणावी लागेल असेही शाह म्हणाले. सध्या जिल्हा बँक संकाटात अडकल्या आहेत. कारण या बँकांमध्ये हजारो कोटींचे घोटाळे झाले आहेत. संकटात असलेल्या सर्व बँकांना संकटातून बाहेर काढणार असल्याचं त्यांनी सांगितले. विखे पाटील यांनी उभारलेला सहकारी साखर कारखाना हा सहकारे उत्तम मॉडेल आहे. या कारखान्याचे प्रशासन उत्तम असल्याचे शाह म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :