Shiv Jayanti 2022 : शिवस्मारक आपल्या खासगी जागेत उभारा, अनधिकृतपणे पुतळा बसविणाऱ्यांना पुरुषोत्तम खेडेकर यांनी ठणकावलं
Shiv Jayanti 2022 : शिवस्मारक आपल्या खासगी जागेत उभारा, अशा शब्दात मराठा सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अनधिकृतपणे पुतळा बसविणाऱ्यांना ठणकावलं आहे.
![Shiv Jayanti 2022 : शिवस्मारक आपल्या खासगी जागेत उभारा, अनधिकृतपणे पुतळा बसविणाऱ्यांना पुरुषोत्तम खेडेकर यांनी ठणकावलं Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 Build a Shiv Smarak in your private space says Purushottam Khedekar Shiv Jayanti 2022 : शिवस्मारक आपल्या खासगी जागेत उभारा, अनधिकृतपणे पुतळा बसविणाऱ्यांना पुरुषोत्तम खेडेकर यांनी ठणकावलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/5f05258b28157ee4a0eea6908d1e3fce_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बुलढाणा : मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवरायांचे अनधिकृत पुतळे बसविणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. शिवरायांचे अनधिकृत पुतळे बसवणं अपमान करणारी बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर आपल्या खासगी जागेत शिवस्मारक उभारा अशा शब्दांत खेडेकरांनी निशाणा साधला आहे.
राज्यभरात काही मंडळी अनधिकृतपणे आपल्या सोयीनुसार गावोगावी - चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसविण्याचा आटापिटा करीत आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी ही जी स्पर्धा लागली आहे ही बाब शिवाजी महाराजांना कमीपणा आणणारा असून अपमान करणारी आहे. त्यापेक्षा त्यांनी यापेक्षा वेगळं शिवस्मारक आपल्या खासगी जागेत सुरू करावं, अशा शब्दात मराठा सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अनधिकृतपणे पुतळा बसविणाऱ्यांना ठणकावल आहे. यामुळे आतातरी अनधिकृत पुतळे बसविण्याचे थांबेल का असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
डॉ. पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, अरबी समुद्रातील जे रखडलेलं शिवस्मारक आहे ते आता जवळपास संपलेलं स्वप्न आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने आता छत्रपतींचे वडील शहाजी राजे यांच्या वेरूळ आणि आई जिजाऊंच्या सिंदखेडराजा याच्या मधोमध विदर्भ आणि मराठवाडा च्या सीमेवर 200 - 300 एकर जमीन घेऊन अद्ययावत असे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक उभं करावं.
येत्या शनिवारी (19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.
संबंधित बातम्या :
Shiv Jayanti 2022 : गेवराईत शिवरायांना अनोखी मानवंदना; साकारली भव्य कलाकृती, ड्रोननं टिपली मनमोहक दृश्य
Shiv Jayanti 2022 : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे? माहिती आहे का? पहिल्या पुतळ्याच्या निर्मितीची रंजक कहाणी
Shivjayanti 2022 : शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर, गृहविभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता
शिवजयंती निमित्तानं सादिया सलीमचा उपक्रम, मुलींच्या शिक्षणासाठी मुंबई - पुणे मॅरेथॉन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)