एक्स्प्लोर

शिवतारेंनी बारामतीत अडचण केल्यास कल्याणमध्येही अडचण होऊ शकते; मिटकरींचा मुख्यमंत्री शिंदेंना थेट इशारा

Ajit Pawar Vs Vijay Shivtare : विजय शिवतारे यांच्या भूमिकेनं बारामतीत महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत. तर, अजित पवार गट देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.

Ajit Pawar Vs Vijay Shivtare : बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) अजित पवारांसाठी (Ajit Pawar) प्रतिष्ठेचा मुद्दा झाला असतानाच, आता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी देखील बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) नेते आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात अडचण निर्माण केल्यास, कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Constituency) देखील अडचण होऊ शकते. तिथे श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) उमेदवार असतील, असा थेट इशारा अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिला आहे. 

दरम्यान यावर बोलतांना मीटकरी म्हणाले की, "महायुतीचे घटक असतांना देखील विजय शिवतारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात बोलत असतील, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना समज देत नसतील. तसेच शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघात अडचण निर्माण करत असतील, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात अडचण निर्माण होऊ शकते. तिथे श्रीकांत शिंदे उमेदवार असतील. सर्वांनी सर्वांचं सन्मान ठेवला पाहिजे, आम्ही त्याचं पालन करतोय. पण, याचा अर्थ शिवतारेंनी वाचळवीरांसारखं काहीही बडबड करावी हे आम्ही सहन करून घेणार नाही," असे अमोल मिटकरी म्हणाले. 

मुख्यमंत्री शिंदेंकडून शिवतारेंना समज...

पुढे बोलतांना मिटकरी म्हणाले की, "शिवतारे यांनी निवडणूक लढवायची का?  हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. लोकशाहीत सर्वांना तो अधिकार आहे. मात्र, महायुतीमध्ये राहून आमच्याच वरिष्ठ नेत्यांबद्दल अपशब्द वापरण्याचे जे काही त्यांनी मागील काही दिवसांपासून सत्र चालवला आहे, त्याला आमचा तीव्र विरोध आहे. आमचे नेते सुनील तटकरे यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील कळवले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील त्यांना समज दिली असल्याचं कळत आहे. अजित पवारांबद्दल चुकीचं बोलून मी खासदार होईल असं शिवतारे यांना वाटत असेल, तर मागील काळात मतदारसंघात कोणी कामं केली हे बारामतीकरांना माहित आहे. शिवतारे यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांचा तीळ मात्र फरक देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पडणार नाही. तसेच, शिवतारे यांना जनता त्यांची जागा दाखवून देतील असेही मिटकरी म्हणाले.

शिवतारे मुळात वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याच्या मागे कोणी मास्टरमाइंड असेल असे वाटत नाही. त्यांच्या मागे फक्त त्यांचे सडके मेंदूत असू शकतात, दुसरं कोणी असणार नाही, असेही मिटकरी म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Vijay Shivtare : विजय शिवतरे बारामती लोकसभेला अपक्ष शड्डू ठोकणारच! एकमताने ठराव मंजूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget