Akola ZP By Election : अकोला झेडपी पोटनिवडणुकीत वंचितची सरशी पण सत्ता कायम ठेवण्याचा रस्ता कठिणच!
Akola ZP By Election : अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकालात वंचितची बाजी मारली आहे. 14 पैकी सहा जागा जिंकल्या आहे. आरक्षणामुळं सहा जागा रद्द झाल्यानंतर वंचितच्या 16 जागा झाल्या होत्या.
Akola ZP By Election : अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकालात वंचितची बाजी मारली आहे. 14 पैकी सहा जागा जिंकल्या आहे. आरक्षणामुळं सहा जागा रद्द झाल्यानंतर वंचितच्या 16 जागा झाल्या होत्या. आता सहा जागा जिंकत वंचितनं आपल्या 6 जागा कायम ठेवल्या आहेत. त्यांना एका अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळं त्यांचा आकडा 23 होत आहे. तर दुसरीकडे शिवसेना 13, काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी 4-4 अशा आठ, प्रहार एक तर दोन अपक्ष त्यांच्या गटाचे समर्थित दोन अपक्ष असे महाविकास आघाडीच्याही 23 जागा होत आहे. तर भाजपच्या 5 जागा आहेत. जर भाजप मागील निवडणुकीप्रमाणं तटस्थ राहिली तरीही आता वंचितचा रस्ता हा खडतर दिसून येत आहे.
सध्या पोटनिवडणूक झालेल्या एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 14
वंचित : 06
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस : 01
प्रहार : 01
अकोला जिल्हा परिषदेतील आताच्या पोटनिवडणुकीनंतरचं पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 53
वंचित बहूजन आघाडी : 22
शिवसेना : 13
भाजप : 05
काँग्रेस : 04
राष्ट्रवादी : 04
प्रहार : 01
वंचित समर्थित अपक्ष : 01
अपक्ष : 03
ZP Election Results 2021 : ओबीसी आरक्षणामुळं ZPमध्ये कोणत्या पक्षाच्या किती जागा रद्द झाल्या? वाचा सविस्तर
अकोला जिल्हा परिषदेतील 2020 मधील
निवडणुकीनंतरचं पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 53
वंचित बहूजन आघाडी : 22
शिवसेना : 13
भाजप : 07
काँग्रेस : 04
राष्ट्रवादी : 03
अपक्ष : 04
अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार
1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना
2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित
3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष
4) अंदूरा : मीना बावणे : वंचित
5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी
6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष
7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित
8) बपोरी : माया कावरे : भाजप
9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित
10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित
11) दगडपारवा : किरण अवताडे मोहोड : राष्ट्रवादी
12) दानापूर : गजानन काकड : काँग्रेस
13) कुटासा : स्फूर्ती गावंडे : प्रहार
14) तळेगाव बु. : संगिता अढाऊ : वंचित
पंचायत समिती :
निवडणूक झालेल्या एकूण जागा : 28
जाहीर झालेल्या एकूण जागा : 28
वंचित : 16
शिवसेना : 05
भाजप : 04
एमआयएम : 01
प्रहार : 01
अपक्ष : 01