एक्स्प्लोर
Advertisement
'प्रहार'चे तुषार पुंडकर हत्याकांडाचा उलगडा, तिघांना अकोला पोलिसांकडून अटक
'प्रहार'चे तुषार पुंडकर हत्याकांडाचा उलगडा अखेर झाला आहे. हत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
अकोला : अकोल्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हत्याकांडांचा अखेर छडा लागला आहे. तब्बल 35 दिवसानंतर हत्येतील तीन आरोपींना अटक करण्यात आली. अकोला पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. 21 फेब्रुवारीला अकोटमधील शहर पोलीस स्टेशनला अगदी लागून असलेल्या पोलीस वसाहतीत तुषार यांची तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सात वर्षांपूर्वी अकोटमध्ये झालेल्या तेजस सेदाणी हत्याकांडाच्या बदल्यातून पुंडकर यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी तुषार पुंडकरचा बदला घेण्यासाठी ही हत्या आल्याचं पोलीस तपासात निष्पण्ण झालं आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणाचा 'मास्टर माईंड' आणि तेजसचा चुलत भाऊ पवन सेदाणीसह दोघांना यात अटक केली आहे.
बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोल्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पूंडकर यांची 21 फेब्रुवारीला हत्या करण्यात आली होती. अकोट शहर पोलीस स्टेशनला अगदी लागून असलेल्या पोलीस वसाहतीत तुषार यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तुषार यांच्या हत्येनंतर या प्रकरणाचा तपास अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांची सहा विविध पथकं महिनाभरापासून हत्येचा तपास करीत होते. आज अखेर या प्रकरणातील गूढ उकलण्यात अकोला पोलिसांना यश आलं.
अकोल्यातील 'प्रहार'चे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची हत्या, उपचारादरम्यान मृत्यू
11 सप्टेंबर 2013 मध्ये अकोटमध्ये गणपती मंडळाच्या वादातून तेजस सेदाणी हत्याकांड घडलं होतं. तुषार पुंडकर यात मुख्य आरोपी होते. तेजस सेदाणीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तेजसचा चुलत भाऊ पवन सेदाणीनं तुषार यांची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पण्ण झालं आहे. आरोपींमध्ये मुख्य आरोपी पवन सेदानीसह श्याम उर्फ स्वप्नील नाठे, अल्पेश दुधे यांचा समावेश आहे. या प्रकरणात पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी काही आरोपींच्या अटकेची शक्यता आहे.
# 21 फेब्रुवारीच्या रात्री नेमकं काय घडलं :
प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हे त्यांच्या खुमकर दूध डेअरीच्या बाहेर शुक्रवारी रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास मोबाईलवर बोलत आले. या ठिकाणी दोन दुचाकीस्वार त्यांच्याकडे येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांना हल्ल्याची कुणकुण लागताच ते पोलीस वसाहतीकडे पळाले. मात्र, हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. यात त्यांना पाठीत दोन गोळ्या लागल्यात. तर एक गोळी त्यांच्या हाताला चाटून गेली. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने पोलिस कर्मचाऱ्यांनी समोर असलेल्या डॉ. सुरेश व्यवहारे यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. या ठिकाणी त्यांची प्रकृती बिघडल्याने आणि रक्तस्त्राव झाल्याने त्यांना अकोला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
कोण होते तुषार पुंडकर
* बच्चूू कडू यांच्या 'प्रहार जनशक्ती पक्षा'चे माजी जिल्हाध्यक्ष आणि बच्चू कडूंचे अकोल्यातील निकटस्थ.
* बच्चू कडू यांच्या पक्षाचा जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चित चेहरा.
* सध्या अकोला जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष.
* नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अकोटमधून 25 हजारांच्या आसपास मते.
* बच्चू कडू स्टाईल आंदोलनांनी अनेक प्रश्नांवर आक्रमक भूमिका.
* राष्ट्रवादीतून राजकीय करियरला केली होती सुरूवात.
* आई अकोट नगरपालिकेत नगरसेविका
* तुषार 11 सप्टेंबर 2013 रोजी झालेल्या अकोट येथे गणेशोत्सवादरम्यान झालेल्या तेजस सेदाणी हत्याकांडातील प्रमुख आरोपी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement