एक्स्प्लोर
अकोल्यात भाजपची मुसंडी, राष्ट्रवादीचा सुपडासाफ
अकोला : अकोला जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अकोट नगरपालिकेसह तेल्हारा आणि मूर्तिजापूरमध्ये नगराध्यक्षपदासह सत्ता काबीज केली आहे.
काँग्रसेने बाळापुर आणि पातूरमध्ये नगराध्यक्षपदासह सत्ता हस्तगत केली आहे. आधी पाचपैकी तीन नगराध्यक्षपदं असणाऱ्या राष्ट्रवादीचा जिल्ह्यात अक्षरश: धुव्वा उडाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील मोठी ताकद असणाऱ्या भारिप-बहूजन महासंघासह शिवसेनेलाही मतदारांनी नाकारलं आहे.
या निवडणूक निकालांनी जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. तर इतर पक्षांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
अकोला जिल्ह्यातील पाच नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर आणि पातूरमध्ये या पाच नगरपालिकांमध्ये ही निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत जिल्ह्यातील तीन नगरपालिकांवर आपला झेंडा फडकवला.
जिल्ह्यातील सर्वात हायव्होल्टेज लढतीत भाजपने बाजी मारली. अकोट नगराध्यक्षपदावर भाजपचे हरिनारायण माकोडे विजयी झाले आहेत. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी भारिप-बहूजन महासंघाचे उमेदवार सैय्यद शरीफ सिकंदर राणा यांचा पराभव केला. या नगरपालिकेवर आधी काँग्रेसच्या पाठिंब्यानं राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होता.
तेल्हारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या जयश्री पुंडकर 2603 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी आपल्या निकटच्या प्रतिस्पर्धी भारिप-बहूजन महासंघ आणि नगरसेवा समितीच्या उमेदवार निधी अग्रवाल यांचा पराभव केला. येथे भाजपची शेतकरी आघाडीशी युती होती. अकोट आणि तेल्हाऱ्यातील विजयाने भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मतदारसंघात वर्चस्व राखलं आहे.
बाळापूर नगरपालिकेत परिवर्तन आघाडीला धोबीपछाड देत काँग्रेसच्या खतीब घराण्यानं पाच वर्षानंतर सत्ता ताब्यात घेतली आहे. बाळापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ऐनोद्दीन नतीकोद्दीन खतीब 989 मतांनी विजयी झाले. त्यांनी परिवर्तन आघाडीचे विद्यमान नगराध्यक्ष मोहम्मद जमीर शेख ईब्राहिम यांचा पराभव केला. येथे भाजप, राष्ट्रवादी आणि भारिपला भोपळाही फोडता आला नाहीय.
पातुर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या प्रभा कोथळकर 629 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या मंगला वानखडे यांचा पराभव केला. ही नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यातून काँग्रेसनं मिळवली. दरम्यान बाळापूर आणि पातूरात भारिप-बहूजन महासंघानं नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी भोपळा फोडता आला नाही. त्यामुळे या मतदारसंघाचे भारिपचे आमदार बळीराम सिरस्कार यांचं राजकीय भवितव्य धोक्यात आलं आहे.
मुर्तिजापूरच्या नगराध्यक्षपदावर भाजपच्या मोनाली गावंडे 1700 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या संगिता गुल्हाणे यांचा पराभव केला. भाजपनं मूर्तिजापूरात राष्ट्रवादीच्या ताब्यातून सत्ता हिसकावली.
मुर्तिजापुर मोनाली गावंडे भाजप
अकोट हरिनारायण मकोडे भाजप
तेल्हारा जयश्री फुंडकर भाजप
बाळापुर ऐनोद्दिन खतीब काँग्रेस
पातुर प्रभा कोथळकर काँग्रेस
विविध नगरपालिकांचे निकाल :
तेल्हारा नगरपालिका : 17
भाजप : 05
शेतकरी आघाडी : 05
प्रहार आघाडी : 02
शहरविकास आघाडी : 01
काँग्रेस-राष्ट्रवादी : 02
नगरसेवा समिती : 02
बाळापूर नगरपालिका : 23
काँग्रेस : 16
परिवर्तन आघाडी : 07
मुर्तिजापूर नगरपालिका : 23
भाजप : 07
शिवसेना :04
भारिप-बमसं : 04
काँग्रेस : 01
राष्ट्रवादी : 05
अपक्ष : 02
पातुर नगरपालिका : 17
भाजप : 03
काँग्रेस : 06
राष्ट्रवादी : 08
अकोट नगरपालिका : 33
भाजप : 17
शिवसेना : 03
काँग्रेस-राष्ट्रवादी : 11
भारिप -बमसं : 02
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement