Ajit Pawar : नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना सरकार मदत करेल ; अजित पवार
नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या विजयी उमेदवारांचे कौतुक आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना महाविकास आघाडी सरकार मदत करेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
Ajit Pawar : "राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्थिती पाहून पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढण्यात आली. सर्व निवडून आलेल्या विजयी उमेदवारांचे कौतुक आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना महाविकास आघाडी सरकार मदत करेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
अजित पवार म्हणाले, "प्रत्येक पक्ष आपला पक्ष वाढावा यासाठी प्रयत्न करत असतो. मागील काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी असतानाही काही ठिकाणी स्थानिक स्थिती पाहून म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर आदी भागात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशा देखील निवडणुका लढल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी कोरोनाच्या काळात एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला व जिल्हा स्तरावर या निवडणुका घेण्यात आल्या."
"कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी राज्यात बेडची उपलब्धता आहे. कोरोनाची बाधा झाली तरी लगेच ऑक्सिजनची गरज भासत नाही. शिवाय रुग्ण घरीच काळजी व उपचार घेताना दिसत आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार दिली.
सध्या ग्रामीण भागात महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज खंडित करण्याचे काम सुरू आहे, या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, "शेतकऱ्यांच्या थकीत असलेल्या बिलाचे व्याज आणि दंड माफ केले असून शेतकऱ्यांनी आता बिले भरली पाहिजेत. त्यासाठी त्यांना बिलाच्या रक्कमेचे हप्ते करून देण्यात आले आहेत. तरीही रब्बीची पिके गेल्याशिवाय किंवा ही पिके हातात आल्याशिवाय पैसे भरता येणार नाहीत ही असी स्थिती आहे. त्यामुळे आघाडी सरकार यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे असे अजित पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या