Kavathe mahankal result : निवडणुकीपूर्वी म्हणाले, माझा बाप नक्की आठवेल, आता रोहित पाटील म्हणतात, आबा मिस यू!
kavathe mahankal nagar panchayat election 2022 result निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा रोहित पाटील यांनी दिला होता.
![Kavathe mahankal result : निवडणुकीपूर्वी म्हणाले, माझा बाप नक्की आठवेल, आता रोहित पाटील म्हणतात, आबा मिस यू! Kavathe mahankal nagar panchayat result 2022 Maharashtras sangli rohit patil son of r r patil ncp said aaba we will miss you Kavathe mahankal result : निवडणुकीपूर्वी म्हणाले, माझा बाप नक्की आठवेल, आता रोहित पाटील म्हणतात, आबा मिस यू!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/19/2d2d5cea1a45ede4dac6e428656459f2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result) निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं. रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांची प्रचाराची भाषणं चांगलीच गाजली होती. रोहित पाटील यांनी जे बोलले होते, ते करुन दाखवल्याचं चित्र सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये आहे.
निकालानंतर माझा बाप आठवल्या शिवाय राहणार नाही, असं रोहित पाटील म्हणाले होते. आता निकालानंतर रोहित पाटील यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. रोहित पाटील म्हणाले, निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही"
कवठेमहांकाळ नगरपंचात निकाल (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result)
- रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी पॅनेल 10
- शेतकरी विकास पॅनल 6 जागी विजयी
- 1 अपक्ष विजयी
रोहित पाटील प्रचारावेळी काय म्हणाले होते?
कवठेमहांकाळ नगरपंचायतीचा निकाल येत्या 19 तारखेला येईल. माझा बाप काढणाऱ्यांनो तुम्हाला निकालावेळी माझ्या बापाची आठवण नक्की होईल. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला सल्ले देणाऱ्यांनो तुम्ही काय कामं केली ते सांगा.
VIDEO - रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)