(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अनिल देशमुख माझ्यासोबत सर्व बैठकांना होते, मात्र भाजपला ते मंत्रिमंडळात नको होते, अजितदादांचा गौप्यस्फोट
रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी गौप्यस्फोट केले.
Maharashtra Politics : कर्जत, रायगड: माजी गृहमंत्री आणि सध्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे भाजपसोबत (BJP) झालेल्या सर्व बैठकांना माझ्यासोबत उपस्थित होते. भाजपला अनिल देशमुख हे मंत्रिपदी नको होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी गौप्यस्फोट केले.
अजित पवार म्हणाले, "अनिल देशमुख माझ्यासोबत सगळ्या बैठकांना होते. मला मंत्रिमंडळात स्थान हवं असं अनिल देशमुख म्हणाले होते. पण भाजपला ते मंत्रिमंडळात नको होते".
"भाजपला मात्र हे मान्य नव्हतं. आमच्या मंत्रिमंडळाची यादी ज्यावेळी गेली, त्यावेळी आम्ही सांगितलं की, मधल्या कालखंडात आम्ही यांच्यावर बरेच आरोप केले आहेत आणि लगेच मंत्रिमंडळात आम्ही त्यांना घेत आहोत. त्यामुळे आमच्या विश्वासार्ह्यतेवर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे त्यांना घेता येणार नाहीत. त्यामुळे त्यांचं नाव कमी करण्यात आलं. त्यामुळे ते म्हणाले की, मला मंत्रीपद नाहीतर मी तुमच्यासोबत येणार नाही. हे स्पष्ट आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.", असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांकडून लोकसभेच्या 4 जागा जाहीर
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Lok Sabha Election) यांनी लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Election 2024) मोठी घोषणा केली आहे. "मार्च 2024 मध्ये पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक जाहीर होतील, असा माझा अंदाज आहे. सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या लोकसभेच्या जागा लढवणार आहोत", असं अजित पवार म्हणाले. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस (Karjat NCP Shibhir) अजित पवार गटाचे शिबीर सुरु आहे. या शिबिरात अजित पवारांनी ही घोषणा केली.
"आपल्याकडे असणाऱ्या चार जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या आपण लढवणार आहोतच. परंतु इतर ज्या जागा आहेत त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल तर तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला जागा वाटप करता येईल" असं अजित पवार म्हणाले.
पाहा व्हिडीओ : Ajit Pawar On Anil Deshmukh : भाजपला अनिल देशमुख मंत्रिपदावर नको होते : अजित पवार : ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :
जयंत पाटलांनी शब्द दिला, पण पाळला नाही; प्रकाश सोळंकेंबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट