एक्स्प्लोर
'भलत्या' शब्दावरुन गोंधळ, अतुल भातखळकरांच्या निलंबनाची मागणी
आमदार अतुल भातखळकर यांना तातडीने निलंबित करा, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली. त्यामुळे या मुद्द्यावरुन तब्बल तीनवेळा विधानसभेचं कामकाज तहकूब झालं.
नागपूर : शिवस्मारकाच्या उंचीवरुन वाद सुरु असताना 'भलत्या' शब्दावरुन विधानसभेत जोरदार गोंधळ झाला. भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी शिवस्मारकाच्या विषयावर बोलताना 'भलत्या विषयावरुन' या शब्दाचा वापर केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले.
आमदार अतुल भातखळकर यांना तातडीने निलंबित करा, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली. त्यामुळे या मुद्द्यावरुन तब्बल तीनवेळा विधानसभेचं कामकाज तहकूब झालं.
भाजपचं सरकार मनुवादी असल्याचा आरोपही यावेळी अजित पवारांनी केला. त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले आणि म्हणाले, अजित पवारांचं 'मनुवादी' म्हणणारे वक्तव्य रेकॉर्डवरुन काढून टाकावं.
भातखळकरांनी माफी मागावी - विखे पाटील
आमदार अतुल भातखळकर आणि मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींचा अवमान केला आहे, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तसेच. या मुद्द्यावर शिवसेना मूग गिळून गप्प का, वाघाची शेळी झालीय, असा निशाणा विखेंनी शिवसेनेवर साधला.
भातखळकरांकडून माफीनामा
अतुल भातखळकर यांनी स्पष्टीकरण दिले की 'भलता' हा शब्द प्रयोग छत्रपतींबाबत केला नाही, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल केला होता. मी माझे शब्द मागे घेतो." त्यानंतर भातखळकर म्हणाले, सदनातील सदस्यांच्या भावना लक्षात घेता मी सदनाची माफी मागतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement