भाषण करताना सावित्रीबाई फुलेंबाबत चुकीचा उल्लेख, अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
Ajit pawar : 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' म्हणण्याऐवजी 'क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर' म्हटल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.
मुंबई : भाषणात 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' म्हणण्याऐवजी 'क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर' म्हटल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. "पुणे येथील कार्यक्रमात भाषणावेळी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊं माँसाहेब' या महामानवांचं स्मरण करताना, कर्तृत्व सांगताना बोलण्याच्या ओघात माझ्याकडून 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' ऐवजी 'क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर' असा उल्लेख झाला. 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांचं कार्य आपल्या सर्वांना माहित आहे. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो," अशा शब्दात अजित पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.
अजित पवार यांच्याकडून सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाल्यानंतर त्यांनी तात्काळ आपली चूक मान्य करत माफी मागितली. परंतु, विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली. अजित पवार यांच्याकडून सावित्रीबाई ‘होळकर’ असा उल्लेख झाल्याने भाजपच्या आचार्य तुषार भोसले यांनी व्हिडीओ ट्विट करत माफी मागण्याची मागणी केली. तुषार भोसले यांनी अजित पवार यांच्यावर टीका देखील केली आहे.
वाचाळवीर अजित पवार यांनी आधी संभाजी महाराजांच्या मुद्यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्या आता क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा अपमान केला. आतातरी माफी मागणार की मग्रूरपणे ठाम राहणार असा सवाल उपस्थित करत आर्चार्य भोसले यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय.
आतातरी माफी मागणार की ठाम च राहणार मग्रूर @AjitPawarSpeaks ❓ pic.twitter.com/EYP4c8naVT
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) January 6, 2023
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! राज्यात 1432 वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर, राज्य शासनाचा निर्णय