एक्स्प्लोर
सायरन वाजल्याने नगरमध्ये जिल्हा बँकेवरील दरोड्याचा प्रयत्न फसला!
मात्र त्याच वेळी सायरन वाजल्याने त्यांना तिथून पळ काढावा लागला. बॅंकेत सुमारे 40 लाख रुपयांची रक्कम होती.

अहमदनगर : अहमदनगरमधील वाळवी गावात असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोड्याचा प्रयत्न झाला. परंतु सायरन वाजल्याने चोरट्यांचा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला. चोरट्यांनी गुरुवारी रात्री जिल्हा बँकेच्या दरवाजाची पाच कुलुपं तोडली. मात्र त्याच वेळी सायरन वाजल्याने त्यांना तिथून पळ काढावा लागला. बॅंकेत सुमारे 40 लाख रुपयांची रक्कम होती. त्याचबरोबर चोरट्यांनी बँकेच्या वर असलेल्या सोसायटीच्या दरवाजाचीही कुलुपं तोडली. सकाळी बँकेचं आणि सोसायटीचा दरवाजा उघडा असल्याचं आढळल्यावर, नागरिकांनी पोलिस आणि कर्मचाऱ्यांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहाणी करुन कुलुपावरील ठशांचे नमुने घेतले. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























