एक्स्प्लोर
Advertisement
अहमदनगर पोलिसांकडून 60 लाखांचे फटाके खरेदी
पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलिसांना दिवाळीसाठी एक हजाराचे फटाके खरेदी करण्याचा फतवा काढला. जिल्ह्यातील तालुका पोलीस ठाण्यातही फटका विक्री करण्यात येणार आहे.
अहमदनगर : सरकारकडून प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांनी सरकारच्या उपक्रमाला हरताळ फासला आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलिसांना दिवाळीसाठी एक हजाराचे फटाके खरेदी करण्याचा फतवा काढला. जिल्ह्यातील तालुका पोलीस ठाण्यातही फटका विक्री करण्यात येणार आहे.
अहमदनगर पोलीसांकडून तब्बल साठ लाखांचे फटाके खरेदी करण्यात आले आहेत. नागपूरच्या उमसान एन्टरप्राईजेस कंपनीकडून तब्बल पाच हजार फटाका बॉक्स खरेदी करण्यात आले.
पोलिसांना एक हजार पन्नास रुपये, तर नागरिकांना एक हजार चारशे दहा रुपयाने विक्री होणार आहे. तर पोलिसांच्या पगारातून पैसे कपात करण्यात येतील. हा पैसा पोलीस कल्याण निधीसाठी वापरण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पोलीस मुख्यालयात फटाके उतरवण्यासाठी दहा पोलीस तैनात आहेत. तर त्याचबरोबर तालुका स्तरीय पोलीस ठाण्यात फटका स्टॉलही लावण्यात येणार आहेत. तालुका पोलीस ठाण्यात फटाका विक्रीसाठी आठ पोलीसांचं नियोजन आहे.
दिवाळीतील फटकेबाजी हा प्रत्येकाचा ऐच्छिक विषय आहे. अनेक पोलीस फटाके वाजवत नाहीत. मात्र पोलीस अधीक्षकांच्या फतव्याने नाईलाजाने त्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. शिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखणारे पोलिसच आता फटाके विक्री करणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement