Abdul Sattar: 'कुणी आरे केलं तर कारे करा, एक मारली तर चार मारा'; कृषिमंत्री सत्तारांचा अजब सल्ला
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar News) आपल्या परभणीतील (Parbhani News Updates) भाषणामुळं चर्चेत आले आहेत.
Adbul Sattar Parbhani Speech: राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar News) आपल्या परभणीतील (Parbhani News Updates) भाषणामुळं चर्चेत आले आहेत. कुणी आरे करत असेल तर त्याला कारे करा एक मारली तर त्याला चार मारा अशा शब्दात त्यांनी परभणीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना अजब सल्ला दिला आहे. अब्दुल सत्तारांनी या भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही चांगलीच टीका केली आहे.
येणाऱ्या काळात आमच्याकडे अजून दोन-तीन खासदार आणि पाच-सहा आमदारही येणार
ठाकरे यांच्यावर टीका करत सत्तार यांनी म्हटलं की, ग्रामपंचायत सदस्यालाही मेजॉरिटी कळते मात्र यांना कळली नाही. हे फक्त निवेदन घेऊन मागे द्यायचे. आत्ताचे मुख्यमंत्री निवेदन घेऊन प्रश्न सोडवतात, अशी टीका करत येणाऱ्या काळात आमच्याकडे अजून दोन-तीन खासदार आणि पाच-सहा आमदारही येणार असल्याचा गौप्यस्फोटही सत्तार यांनी केला आहे. हिंदू गर्व गर्जना यात्रेनिमित्त राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार परभणी दौऱ्यावर होते यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
ग्रामपंचायत सदस्याला ही मेजॉरिटी कळते मात्र यांना कळली नाही
सत्तार यांनी म्हटलं की, भाजपबरोबर निवडणुका लढवल्या. त्यांचे फोटो वापरून निवडणूक जिंकल्या. मात्र यांनी सरकार दुसऱ्यांसोबत स्थापन केले. आमदार, खासदार सर्वजण सांगत असताना त्यांचं कुणीही ऐकलं नाही, असं सत्तार यांनी म्हटलं आहे. ग्रामपंचायत सदस्याला ही मेजॉरिटी कळते मात्र यांना कळली नाही. त्यामुळेच आम्ही यांना सोडून गेलो. तेव्हा हे फक्त निवेदन घेत होते आणि मागच्यांना देत होते. त्यामुळे आमचे प्रश्न सुटले नाहीत. आता एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्वजण निवेदन स्वीकारून ते सोडवण्याचं काम करत आहेत, असं सत्तार यांनी म्हटलं आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले की, येणाऱ्या काळातही आमच्याकडे चार-पाच आमदार आणि तीन दोन तीन खासदारही येणार आहेत. शिवाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जर कोणी धमकावत असेल तर त्याला आरेला कारे करा एक मारली तर चार मारा तसेच अधिकारी जर सामान्य शिवसैनिकांचं काम करत असतील तर ते त्यांच्यावर उपकार करत नाहीत, तर ते त्यांचं कर्तव्य असल्याचे ही सत्तार यांनी यावेळी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Abdul Sattar : कोण कुठे जाणार ये वक्त बतायेगा, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचे सूचक वक्तव्य