एक्स्प्लोर
अहमदनगरमध्ये गाडीची चावी तरुणाच्या डोक्यात खुपसली!
पैशांच्या वादातून गाडीची चावी डोक्यात खुपसल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. प्रतीक आरण असं या तरुणाचं नाव असून, तो नेवासा तालुक्यातील घोडेगावचा रहिवासी आहे.

अहमदनगर : पैशांच्या वादातून गाडीची चावी डोक्यात खुपसल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. प्रतीक आरण असं या तरुणाचं नाव असून, तो नेवासा तालुक्यातील घोडेगावचा रहिवासी आहे.
पैशाच्या वादातून मंगळवारी रात्री प्रतीकला फोनवरुन शिवीगाळ करण्यात आली होती. पण बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास प्रतीकला घोडेगावला चौकात तिघांनी मारहाण केली.
या मारहाणीत अक्षय चेमटे नावाच्या तरुणाने प्रतीकच्या डोक्यात चावी खुपसली. चावी डोक्यात खुपसल्यानंतर त्यावर जोरानं दाबल्याने ती थेट प्रतीकच्या डोक्यात मेंदूपर्यंत घुसली. यामुळे प्रतीक जमिनीवर कोसळला.
यानंतर प्रतीकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, पुढील उपचारासाठी अहमदनगरच्या आनंदऋषी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन चावी काढण्यात आली. सध्या प्रतीकची तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
Advertisement























