एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16.06.2018

*’एबीपी माझा’च्या वाचक-प्रेक्षकांना रमझान ईदच्या शुभेच्छा*
- धर्म वाचवण्यासाठी गौरी लंकेश यांची हत्या, परशुराम वाघमारेनं हत्येची कबुली दिल्याचा एसआयटीचा दावा, अजूनही तीन साथीदारांचा शोध सुरु goo.gl/Tg8FPo
- फुले पगडीचा स्वीकार म्हणजे कोणत्याही वर्गाविरोधातील मत नव्हे, पुणेरी पगडीवरील वादानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया https://goo.gl/LDWBrQ
- लोकांची कामं करतो म्हणूनच कॉलर उडवतो, खासदार उदयनराजे यांचं आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र https://goo.gl/qibeUq
- हिमाचल प्रदेशात 17 हजार फुटांवर अडकलेल्या महाराष्ट्राच्या 11 ट्रेकर्सना वाचवण्यात यश, इंडो-तिबेटन पोलिसांची कामगिरी, बदलापूरच्या तरुणाचा मृत्यू https://gl/KuH93e
- औरंगाबादचा मराठमोळा निर्लेप उद्योग बजाज यांच्या खात्यात, 80 कोटीत राम भोगलेंकडून विक्री, 500 कामगारही बजाज समूहात दाखल https://gl/pQ5pEz
- पुढील आठवडाभर महाराष्ट्र कोरडाच राहणार, हवामान विभागाचा अंदाज, पेरणीच्या तयारीतील बळीराजा चिंतेत https://t.co/kaR81wXnxG
- लातुरात मुलाने नारळ पाण्यातून विष पाजल्याने वडिलांचा मृत्यू, आईची प्रकृती गंभीर, संपत्तीच्या वादातून पालकांवर विषप्रयोग https://gl/nC5eef
- मुलं चोरणाऱ्या टोळ्या गावागावात फिरत असल्याच्या व्हॉट्सअप अफवांतून जमावाकडून काही जणांना बेदम मारहाण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन http://abpmajha.abplive.in/
- नोकरीच्या शेवटच्या दिवशी सॉफ्टवेअर इंजिनिअरची घोड्यावरुन ऑफिसला सवारी, अखेरचा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी अनोखी पद्धत https://goo.gl/j7CvgQ
- देशभरात ईदचा उत्साह, राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शुभेच्छा https://goo.gl/GgJENC ईदच्या दिवशीही काश्मिरमध्ये दगडफेक, पाकिस्तानी झेंडे फडकावले https://goo.gl/7ZiYT2
- जम्मूच्या पुलवामात अपहरण करुन हत्या केलेले शहीद जवान औरंगजेब यांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ समोर, दहशतवाद्यांना निर्भीड उत्तर https://goo.gl/Yei2Y8
- अभिनेता राजेश शृंगारपुरे पुन्हा एकदा ‘मराठी बिग बॉस’च्या घरात, चार आठवड्यांनंतर वाईल्ड कार्ड एन्ट्री https://goo.gl/GvNSeq
- निगेटिव्ह प्रतिक्रिया मिळूनही सलमान खानच्या 'रेस 3'ची बक्कळ कमाई, पहिल्या दिवशी 29.17 कोटींचा गल्ला https://goo.gl/JT5uZa
- इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला धक्का, यो यो चाचणीत अंबाती रायुडू नापास https://goo.gl/qrMrbg
आणखी वाचा























