स्मार्ट बुलेटिन | 07 जुलै 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. विद्यापीठ परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याच्या सूचना, अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत यूजीसी अनुकूल, अंतिम निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागणार
2. राज्यात 8 जुलैपासून अटीशर्तींसह हॉटेल, लॉजेस सुरु, 33 टक्के क्षमतेची अट पाळावी लागणार, रेस्टॉरंट्सबाबद अद्याप निर्णय नाही
3. राज्यात 24 तासात 5 हजार 368 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, दिवसभरात 3522 रुग्ण कोरोनामुक्त, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मुंबईने चीनलाही मागे टाकलं
4. शरद पवार आणि गृहमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांची भेट, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पारनेर प्रकरणावर चर्चा झाल्याची शक्यता, अनिल देशमुखांकडून पोलीस आयुक्तांची भेट
5. महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, आघाडीत समन्वय नसल्याच्या चर्चेनंतर राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल
6. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून शरद पवारांची मुलाखत, चीनपासून राज्यातील राजकीय घडामोडींवर पवार बोलल्याचं राऊतांचं ट्वीट
7. मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे द्या विनोद पाटील यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
8. जम्मू काश्मीरच्या पुलवामामुळे एका दहशतवाद्याला कंठस्नान, आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता, एका भारतीय जवानाला चकमकीत वीरमरण
9. गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा द्यावी, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
10. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आज 39वा वाढदिवस, क्रिकेटर्ससह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव, ड्वेन ब्राव्होकडून खास गिफ्ट, 'हेलीकॉप्टर 7' गाणं रिलीज