एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 1 जून 2019 | शनिवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटिनमध्ये
-
- एव्हिएशन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेलांना ईडीची नोटीस, 6 जूनला होणार चौकशी, गोंदियातल्या सभेत मोदींनी दिले होते कारवाईचे संकेत
- कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, मुंबईतल्या चिंतन बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर
- डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला 4 जूनपर्यंत सीबीआय कोठडी पुणे सत्र न्यायालयाचा आदेश
- शिर्डी साई मंदिरात प्रवेश करताना एक वर्षाच्या आतील बाळांची नोंद होणार, साई संस्थानचा निर्णय
- मुंबईतील म्हाडांच्या घरांसाठी आज सोडत, 217 सदनिकांसाठी सुमारे 66 हजार अर्ज, अनेकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार
- बजरंग दलानं तरुणांना बंदुका चालवण्याचं प्रशिक्षण दिल्याचा आरोप, मीरारोडचे भाजप आमदार मेहतांच्या शाळेतल्या कॅम्पचे फोटो व्हायरल, पोलिसांत तक्रार
- 5 जुलैला केंद्र सरकार अर्थसंकल्प मांडणार, लोकसभा निवडणुकीनंतरचा पहिला अर्थसंकल्प, 19 जूनला नव्या लोकसभा अध्यक्षांची नियुक्ती
- निम्याहून अधिक भारतात उष्णतेची लाट, उष्माघातानं आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती
- स्थानिकांच्या तुफान दगडफेकीचा काश्मीर पोलिसांकडून संयमानं सामना, सोशल मीडियावर कौतुक, शुक्रवारच्या हिंसाचाराचा व्हीडिओ व्हायरल
- विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानवर 8 विकेट्सनी मात, वॉर्नरची 88 धावांची महत्त्वपूर्ण खेळी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement