स्मार्ट बुलेटिन | 28 जुलै 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. महाराष्ट्रात काल दिवसभरात 8706 रुग्ण कोरोनामुक्त, तर 7924 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 24 तासात 227 रुग्णांचा मृत्यू
2. जगभरात आतापर्यंत 1 कोटी 66 लाख जण कोरोनाबाधित, मागील 24 तासात 2 लाख 12 हजार नव्या रुग्णांची नोंद, तर चार हजार मृत्युमुखी
3. बकरी ईदला कुर्बानीवर बंदी नाही, नवाब मलिक यांचं स्पष्टीकरण, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर बकरी वाहतुकीबाबत अंतिम निर्णय होणार
4. सरकार पाडणार नाही, महाविकास आघाडीने चालवून दाखवावं, मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला फडणवीस यांचं उत्तर, स्टेअरिंगवरुनही टोला
5. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट, 3 ऑगस्टला होणारं अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता
6. सरकारने लॉकडाऊन करावं, आम्ही लोकांना लॉकडाऊन मोडण्याचं आवाहन करु, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य
7. कोरोनामुळे तब्बल दहा कोटी नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता, संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आकडेवारी जाहीर
8. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल, दाट धुक्यांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली
9. रायगडमधील रोहा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून, 20 वर्षीय आरोपीला बारा तासात अटक
10. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निर्माता दिग्दर्शक करण जोहरची आठवडाअखेरीस चौकशी होणार, तर महेश भट यांची काल अडीच तास चौकशी
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 जुलै 2020 | मंगळवार | ABP Majha