स्मार्ट बुलेटिन | 24 जुलै 2020 | शुक्रवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. महाराष्ट्रात काल दिवसभरात 9 हजार 500 हून अधिक रुग्ण, 24 तासांत 298 रुग्णांचा बळी, तर मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 61 दिवसांवर
2. देशात काल दिवसभरात 45 हजार कोरोना बाधितांची नोंद, आतापर्यंत 29 हजार 861 रुग्णांचा मृत्यू, तर 7 लाख 82 हजार 606 रुग्ण कोरोनामुक्त
3. जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 1 कोटी 56 लाखांच्या पार, तर आतापर्यंत 6 लाख 35 हजार रुग्णांचा मृत्यू
4. परीक्षांबाबतच्या यूजीसीच्या सर्व याचिकांवर 27 तारखेला एकत्र सुनावणी, तर मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकला, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या सुचना
5. पुणेकरांचा लॉकडाऊन संपला, पूर्वीच्या नियमांप्रमाणे व्यवहार सुरु राहणार, सम-विषम पद्धतीने दुकानं सुरु ठेवण्यास व्यापाऱ्यांचा विरोध
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 24 जुलै 2020 | शुक्रवार | ABP Majha
6. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही गावांत चाकरमान्यांना 14 दिवसांचा क्वॉरंटाईन बंधनकारक, गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्यांची मोठी अडचण
7. चंद्रभागेच्या वाळवंटात वाळू माफियांचा उच्छाद, अनेक मंदिरं आणि समाध्या धोक्यात, माफियांवर आळा घालण्याची तातडीची गरज
8. राजस्थान हायकोर्टात सचिन पायलट यांच्यासह समर्थक आमदारांची परीक्षा, पायलट यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांच्या याचिकेवर आज सुनावणी
9. मुंबई पोलीस अभिनेत्री कंगना राणौतला समन्स पाठवणार, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात कंगनाचा जबाब नोंदवणार
10. सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' आज प्रदर्शित होणार, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चाहत्यांना थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार