एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 20 जून 2019 | गुरुवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. काही दिवसांवर असलेल्या मान्सूनच्या हजेरीला जुलै उजाडणार, वायु वादळाचा फटका, शेतकऱ्यांचा जीव टांगणीला 2. मुख्यमंत्रिपदाबाबत सेना-भाजपचं ठरलंय, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य, तर सर्व समसमान पाहिजे, उद्धव यांचा सूचक इशारा 3. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधणार, देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक योजनांची माहिती देशासमोर मांडण्याची शक्यता 4. 'एक देश एक निवडणुकी'बाबत काँग्रेसमध्ये मतभेद, पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर काँग्रेसचा बहिष्कार, तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरांचे समर्थन 5. मुंबईत ‘नो पार्किंग’ झोनमध्ये चारचाकी पार्क केल्यास 10 हजारांचा दंड, बेशिस्त वाहनधारकांना लगाम घालण्यासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय 6. विधानभवनाच्या कँटिंनमध्ये मटकीच्या उसळमध्ये चिकनचे तुकडे, कँटिन कंत्राटदाराविरोधात तक्रार 7. काँग्रेसचे बंडखोर आमदार कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या वाटेवर, विधानसभेच्या आवारात शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत दिसल्याने चर्चांना उधाण 8. बनावट शिक्क्यांच्या साहाय्याने स्टॅम्प विक्री करणाऱ्या कुटुंबाला पुणे पोलिसांच्या बेड्या, 68 लाख 38 हजार रुपयांचे खोटे शिक्के मारलेले स्टॅम्प जप्त 9. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार मुंबई विद्यापीठ राज्यात प्रथम क्रमांकावर, तर देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थाच्या यादीत चौथा क्रमांक 10. न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेवर सनसनाटी विजय, पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात व्हिडीओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















