स्मार्ट बुलेटिन | 16 सप्टेंबर 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
१. सीरमच्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीला पुन्हा सुरुवात, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला डीजीसीआयची परवानगी
२. कांदा निर्यात बंदी प्रकरणी काँग्रेसचं आज राज्यव्यापी आंदोलन, तर निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा उदयनराजेंचा केंद्र सरकारला घरचा आहेर
३. राज्य सरकार पोलिसांची १२ हजार ८९४ रिक्त पदं भरण्याच्या तयारीत, मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता, पोलीस दलावरील ताण कमी होणार
४. मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करणार, उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पुणे पोलिसांची नोटीस
५. मराठा आरक्षणामुळे थांबवलेली मेगाभरती सरकारने पुन्हा सुरु करावी, ओबीसी नेत्यांची मागणी, तर तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण द्या, खासदार संभाजीराजेंची मागणी
६. मुंबई महापालिकेचं आजपासून मिशन मास्क अप, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांकडून जागेवरच २०० रुपयांचा दंड वसूल करणार
७. राज्यात एका दिवसातील कोरोनाबळींचा उच्चांक, तब्बल ५१५ जणांचा मृत्यू, तर दिवसभरात २० हजार ४८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
८. कारने चिरडूनही चिमुकला आश्चर्यकारकरित्या बचावला, मुंबईच्या मालवणीमधील काळजाचा ठोका चुकवणारी घटना, कारचालकाचा शोध सुरु
९. शरीरातील ऑक्सिजन पातळी मोजणारं अॅपल वॉच 6 आणि एसई लॉन्च, अॅपलच्या हेल्थ वॉचसाठी ३० हजार रुपये मोजावे लागणार
१०. 'जस्टिस फॉर सुशांत'पासून 'जस्टिस फॉर कंगना'पर्यंत कसे आलो? उर्मिला मातोंडकरचा सवाल; कंगना, सुशांत प्रकरणावर उर्मिलाची माझा कट्टावर सडेतोड मतं