स्मार्ट बुलेटिन | 16 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. मुंबईला आज अतिवृष्टीचा इशारा; ठाणे, रायगड परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
2. राज्यभरातील पावसाचा जोर ओसरला; पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील खरीप हंगाम पाण्यात, तर तळकोकणात भातशेतीचं नुकसान, मुख्यमंत्र्यांकडून पंचनाम्याचे आदेश
3. पाऊस ओसरल्यानंतरही चंद्रभागेची पूरस्थिती कायम, उजनीतल्या विसर्गामुळे पंढरपूर पाण्याखाली, जवळपास 10 हजार नागरिकांचं स्थलांतर
4. शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याची मागणी खटुआ समितीकडून अमान्य, तर सेवानिवृत्तीचं वय 58 ठेवण्यास राजपत्रिक महासंघाचा विरोध
5. पोलिसांवर हात उगारल्याप्रकरणी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा, कार चालकासह दोन कार्यकर्तेही दोषी; उच्च न्यायालयात दाद मागणार
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार | ABP Majha
6. चॅनलची लोकप्रियता अधोरेखित करणाऱ्या टीआरपीला पुढचे 12 आठवडे स्थगिती, टीआरपी घोटाळ्यानंतर बार्कचा निर्णय, एनबीएकडून निर्णयाचं स्वागत
7. रिफायनरीच्या चौकशीनंतर नाणारमधील जमीन खेरदी-विक्रीच्या चौकशीचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश, महिन्याभरात कृती अहवाल सादर करण्याचं फर्मान
8. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची देशभरात छापेमारी, मुंबईतून कोट्यवधी रूपयांचे अमली पदार्थ जप्त, आठ जणांना अटक
9. बचतीच्या सवयीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत 35 लाखांची वाढ, तर शेअर बाजारातील पडझडीमुळे अमित शहांच्या संपत्तीत घट
10. आयपीएलच्या काल झालेल्या सामन्यात पंजाबचा अखेरच्या चेंडूवर विजय, गेलचा झंझावात, केएल राहुलचीही नाबाद अर्धशतकी खेळी, आज मुंबई विरूद्ध केकेआर सामना रंगणार