एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 जानेवारी 2020 | सोमवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
-
- भाजप नेते जय भगवान गोयलांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरुन वादंग, काँग्रेसची पोलिसांत तक्रार, शिवप्रेमींचा भाजपवर हल्लाबोल
- नरेंद्र मोदींची तुलना महाराजांच्या वंशजांना मान्य आहे का? संजय राऊतांचा सवाल, तर जीभेला लगाम लावा म्हणत संभाजीराजेंचं प्रत्युत्तर
- मनसेनं नव्या झेंड्यावर शिवमुद्रेचा वापर करु नये, आर. आर. पाटील फाऊंडेशनचा विनंतीवजा इशारा, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
- सोलापुरात राष्ट्रवादीकडून सहा जिल्हा परिषद सदस्यांच्या निलंबनानंतर मोहिते पाटील गट आक्रमक, आधी अजित पवारांवर कारवाई करा, जयसिंह मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- मराठीद्वेषी कर्नाटक नवनिर्माण सेना आणि झुंडशाहीविरोधात साहित्यिकांचा ठराव मंजूर, उस्मानाबादमधील साहित्य संमेलनाची सांगता
- मुंबईतील वाडिया हॉस्पिटल निधीअभावी बंद करण्याची प्रक्रिया सुरु, पालिका-राज्य सरकारनं 229 कोटींचं अनुदान थकवलं, कर्मचारी आज आंदोलन करणार
- ठाण्यात छोटा राजनचा उदो उदो, गडकरी रंगायतन समोरील बस स्टॉपवर कुख्यात गँगस्टरला वाढदिवासाच्या शुभेच्छा देणारे बॅनर
- डाव्या विचारसरणीच्या संघटना शिक्षणक्षेत्रातील वातावरण बिघडवताहेत, देशभरातले 200 शिक्षण तज्ज्ञ आणि प्रतिष्ठित विद्यापीठांच्या कुलगुरुंचं मोदींना पत्र
- अमेरिका-इराण संघर्ष सुरुच, इराणकडून अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर पुन्हा रॉकेट हल्ला, सहा दिवसांमधील दुसरा रॉकेट हल्ला
- आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या महिला संघाची घोषणा, हरमनप्रीत कौरच्या हाती कर्णधारपदाची धुरा तर मराठमोळी स्मृती मनधाना उपकर्णधार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement